शासकीय आश्रम शाळा सारखणीचा जगदीश शेडमाके यांची बॉक्सींग मध्ये राज्यस्तरावर निवड.. उपविभागीय अधिकारी नेहा भोसलें (भाप्रसे) नी केले कौतूक !

शालेयवृत्त सेवा
0

शासकीय आश्रम शाळा सारखणीचे विभागीय शालेय क्रिडा स्पर्धेत घवघवीत यश !




नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :

लातूर येथे झालेल्या विभागीय शालेय क्रीडा स्पर्धेत  शासकीय आश्रम शाळा सारखणी ता. किनवट येथील खेळाडूंनी घवघवीत यश संपादन केले असून १७ वर्ष वयोगटातून बॉक्सिंग  स्पर्धेत राज्यस्तरावर जगदीश शेडमाके यांची निवड झाली आहे. त्यांच्या या यशाबद्दल उपविभागीय अधिकारी नेहा भोसले  IAS आणि तहसिलदार डॉ मृणाल जाधव यांनी खेळाडूंचे पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.


        दर वर्षी क्रीडा विभागातर्फे विविध शालेय क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात येते.  शासकीय आश्रम शाळा सारखणी येथील जगदीश शेडमाके व संचिता वाडगुरे प्रथम क्रमांक17 वर्षे वयोगटातून बॉक्सिंग स्पर्धेमध्ये राज्य स्तरावक मजल मारून किनवट तालुक्याचे नाव राज्य पातळीवर नेले आहे. तर  द्वितीय क्रमांक   संदेश कनाके, विशाल तरडे, पृथ्वी धुर्वे, पवन कुसराम, नामदेव गेडाम, कार्तिक जाधव तृतीय क्रमांक गणेश कोरंगे, किरण गुवाडे, तुषार गेडाम, प्राजक्ता दरडे  सुरज टेकाम  रणजित पवार  या विद्यार्थ्यांनी विभागीय स्पर्धेत सहभाग नोंदविला आहे.


         या सर्व विद्यार्थ्यां यशापाठीमागे क्रिडा शिक्षक NIS राष्ट्रीय कोच संदीप यशीमोड व बाळकृष्ण कदम सर  या शिक्षकांचे सुद्धा परिश्रम घेतले आहे. राज्यस्तरीय स्पर्धा व विभागीय स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व खेळाडूंचे  मुख्याध्यापक  कुंभार सर,  शिक्षक - शिक्षकेत्तर कर्मचारी  व सर्वच स्तरातून अभिनंदन केले जात आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)