साने गुरुजी जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांसाठी विभागीय कथाकथन स्पर्धा

शालेयवृत्त सेवा
0

 

विद्यार्थ्यांसाठी विभागीय कथाकथन स्पर्धा

 



अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला शाखा हेलस आणि मानस फाऊंडेशन जालना यांचा संयुक्त उपक्रम


नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :

अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला शाखा हेलस आणि मानस फाऊंडेशन जालना यांच्या संयुक्त सहकार्याने पूज्य साने गुरुजींच्या जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांसाठी मराठवाडास्तरीय विभागीय कथाकथन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. जिल्हास्तरावर 28 डिसेंबर, तर विभागीय स्तरावर 7 जानेवारी रोजी ही स्पर्धा घेण्यात येणार आहेत. स्पर्धेसाठी प्रवेश फी नाही स्पर्धेचे हे चौथे वर्ष आहे, अशी माहिती जिल्हा संयोजक साहित्यिक व्यंकटेश चौधरी यांनी दिली आहे. यावेळी रामेश्वर आळंदे, पद्माकर कुलकर्णी, विलास कोळनूरकर, केशव दादजवार, अक्षय ढोके आदींची उपस्थिती होती.


स्व. दत्तात्रय हेलसकर यांनी १९९४ मध्ये स्थापन केलेल्या साने गुरुजी कथामालेच्या हेलस शाखेतर्फे विद्यार्थ्यांसाठी अनेकविध संस्कारक्षम शैक्षणिक, सामाजिक, विधायक उपक्रम राबविले जातात.  विद्यार्थ्यांमधील सुप्त कलागुणांना प्रोत्साहित करण्यासाठी मराठवाडा स्तरावर इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी दोन गटात कथाकथन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.  विद्यार्थ्यांना सहभागासाठी शिक्षक, मुख्याध्यापकांनी प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन संयोजन समितीने केले आहे. 


स्पर्धेसाठी कोणतीही प्रवेश फी नाही. स्पर्धा मराठवाड्यातील सर्वव्यवस्थापनांच्या प्राथमिक व माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी आहे. बालगट : इयत्ता पाचवी ते सातवी व किशोर गट : इयत्ता आठवी ते दहावी अशा दोन गटात स्पर्धा आहे.️ कथाकथनासाठी विद्यार्थ्यांनी मराठीभाषेतील संस्कारक्षम, बोधप्रद कथेची निवड करणे आवश्यक आहे. कथा आठ ते दहा मिनिटांची असावी. जिल्हास्तरीय विजेत्यांना प्रथम, व्दितीय व तृतीय पारितोषिक म्हणून प्रमाणपत्र व श्यामची आई ग्रंथ भेट देण्यात येईल, तर जिल्हास्तरीय पहिल्या क्रमांकाच्य़ा स्पर्धकांची विभागीय स्पर्धेसाठी निवड करण्यात येईल. बालगट व किशोर या दोन्ही गटातील विभागस्तरीय विजेत्यांना रोख पारितोषिके, प्रमाणपत्र देऊन समारंभपूर्वक गौरविण्यात येईल. 


विजेत्यांना प्रथम पारितोषिक रोख दीड हजार रुपये, द्वितीय : एक हजार रुपये, तृतीय : पाचशे रुपये व उत्तेजनार्थ पारितोषिक आहे. सर्व सहभागी स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येईल. स्पर्धेत सहभाग नोंदणीची अंतिम तारीख  २१ डिसेंबर २०२२ आहे. सहभागासाठी खालील लिंकवर नोंदणी करणे आवश्यक आहे. 

 https://forms.gle/8mgwTH9PCGrriuPb8


जिल्हास्तरीय स्पर्धा मंगळवार, २८ डिसेंबर २०२२, तर विभागस्तरीय स्पर्धा शनिवार, दि. ७ जानेवारी२०२३ रोजी आहे. परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील. स्पर्धा नियोजनात ऐनवेळी काही बदल कराण्याचा अधिकार संयोजन समितीकडे असेल. अधिक माहितीसाठी नांदेड जिल्हा संयोजक व्यंकटेश चौधरी, सहसंयोजक, पद्माकर कुलकर्णी, विलास कोळनूरकर यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)