ऐतिहासिक वास्तूंची माहीती घेत विद्यार्थ्यांनी लुटला शैक्षणिक सहलीचा आनंद..

शालेयवृत्त सेवा
0

 

कमठाला, लोणी, गणेशपुर (रोड), रोहिदास तांडा, गणेशपुर (जुने) शाळेतील १५० विद्यार्थ्यांचा सहभाग !




नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :

किनवट तालुक्यातील कमठाला केंद्र अंतर्गत जिल्हा परिषद शाळा कमठाला, लोणी, गणेशपुर रोड, रोहिदास तांडा, गणेशपुर जुने या शाळेतील १५० विद्यार्थ्यांनी  ऐतिहासिक वास्तू पहात-माहिती घेत विद्यार्थ्याने शैक्षणिक सहलीचा आनंद लुटला.





कमठाला केंद्रातील पाच शाळांतील विद्यार्थ्यांची शैक्षणिक सहल नांदेड जिल्ह्यातील ऐतिहासिक वारसा असलेल्या माहूर येथे काढण्यात आली, सर्व सहभागी शिक्षकांच्या उत्कृष्ट नियोजन व सहकार्यामूळे विद्यार्थ्यांना राष्ट्रकूटकालीन लेणी, जुन्या काळातील तोफा, बंदुका, तलवारी दांडपट्टा तसेच गोंडी व बंजारा संस्कृतीचे प्रत्यक्ष दर्शन घडविणारे पुराणवस्तू संग्रहालय, महाराष्ट्रातील प्रसिध्द तिर्थक्षैत्र- पूर्णपीठ रेणूकादेवी मंदीर, गोंडराजांनी बांधलेला ऐतिहासिक रामगड किल्ला, दत्तात्रयाचे महाराष्ट्रातील सुप्रसिध्द स्थान दत्तशिखर, ट्रेकिंगच्या श्रेणीत येणारे अनूसयामाता मंदीर आणि शेख फरिद वझराचा निसर्गरम्य धबधबा या सर्व स्थळांना भेटी देऊन सायंकाळी सर्व विद्यार्थ्यांना सुखरूप घरी पोहोचवून ही ऐतिहासिक शैक्षणिक सहल यशस्वीपणे पार पडली.



सहलीच्या यशस्वीतेसाठी केंद्रीय मुख्याध्यापक शरद कुरुंदकर, अंकुश राऊत, प्रीतम पाटील, धनरेखा सांगवीकर, स्वरूपा दमय्यावार, लोणीच्या मुख्याध्यापिका वर्षा कुलकर्णी, शाहीन बेग, रमेश मुनेश्वर, गणेशपुर जुने चे मुख्याध्यापक प्रवीण पिल्लेवार, उर्मिला परभणीकर, रोहिदास तांड्याचे मुख्याध्यापक  प्रशांत शेरे, शालिनी सेलूकर, गणेशपुर रोडवरचे मुख्याध्यापक नंदकुमार जाधव, राजेश मोरताडे आदी शिक्षक शिक्षिकेने परिश्रम घेतले.



वाचा:गुजरातहून आलेल्या  लोकांचे जाणून घेतले जीवन  

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)