शिक्षकांचे वेतन लांबणार ,शालार्थ प्रणालीत बिघाड / failure in shalarth system

शालेयवृत्त सेवा
1

  शिक्षकांचे पगार रखडण्याची भीती 




मुंबई : राज्यातील शिक्षकांचे वेतन करण्यासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या शालार्थ प्रणालीत बिघाड निर्माण झाला असून. राज्यातील नगरपालिका, जिल्हा परिषद, खासगी प्राथमिक आणि माध्यमिक अनुदानित शाळा आदी शाळांतील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन हे शालार्थ प्रणालीतून होते. यासाठी शाळेला जिल्हापातळीवर शालार्थ प्रणालीद्वारे वेतन बिले सादर करावी लागतात. मात्र, ही प्रणालीच बंद असल्याने शिक्षकांचे डिसेंबरचे वेतन रखडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.


राज्यातील खासगी, अंशतः व पूर्णतः अनुदानित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक तसेच जिल्हा परिषद, महापालिका, नगरपालिकांमधील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी नोव्हेंबर २०१२ पासून 'शालार्थ' प्रणाली सुरू करण्यात आली होती. नियमित आणि वेळेवर शिक्षकांचे पगार व्हावे हा यामागील उद्देश होता. मात्र शालार्थ प्रणाली सोमवारपासून बंद असल्यामुळे राज्यातील कोणतीही वेतन बिले जनरेट होणार नाही.


शालार्थ प्रणालीत तांत्रिक बिघाड झाल्यामुळे  शिक्षकांचे पगार वेळेवर होण्यास  अडचणी निर्माण झाल्या आहेत. वेतन बिले तयार करून ती कोषागारात सादर करणे व मंजूर करून घेणे आणि बँकांमध्ये निधी जाणे यात काही कालावधी जात असतो. त्यामुळे डिसेंबरचे वेतन रखडण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे शालार्थ प्रणालीत झालेला दोष तातडीने दूर करून राज्यातील शिक्षक- शिक्षकेतरांचे वेतन वेळेवर करण्यात यावे .

- शिवनाथ दराडे 

( राज्य शिक्षक परिषद कार्यवाह )

टिप्पणी पोस्ट करा

1टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा