जुनी पेन्शन योजना सुरू करणे अशक्य - उपमुख्यमंत्री फडणवीस

शालेयवृत्त सेवा
0

 ... तर राज्य दिवाळखोरीत !




नागपूर ( शालेय वृत्तसेवा ) :

राज्यात सरकारी कर्मचारी अधिकारी यांना जुनी निवृत्तीवेतन योजना सुरू करणे हे राज्याच्या आर्थिक स्थितीला आव्हान असून ही योजना नव्याने सुरू ठेवता येणार नाही असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत स्पष्ट केले. 


राज्यातील कर्मचारी अधिकारी संघटनाने राज्य सरकारकडे विविध माध्यमातून जुनी निवृत्तीवेतन लागू करावी अशी मागणी केली होती याबाबत विधानसभेत चर्चा झाली असता फडणवीस यांनी सरकारची भूमिका मांडली. जुनी निवृत्तीवेतन योजना लागू करणे शक्य नाही असे स्पष्ट करताना फडणवीस म्हणाले की जर ही योजना लागू केली तर राज्य दिवाळीखोरीत जाईल. 


जवळपास एक लाख दहा हजार कोटी रुपयांचा मोठा भार या योजनेमुळे सरकारच्या तिजोरीवर पडणार आहे. एवढा मोठा खर्च राज्याच्या हितासाठी शक्य नाही राज्याच्या हितासाठी विचार करणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे जुनी निवृत्तीवेतन योजना लागू करता येणार नाही.

विद्यार्थी आधार अपडेट महत्त्वाचे

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)