शाळेतील चिमुकल्यांनी वनभोजन या कार्यक्रमातून निसर्ग शाळेचा मनमुराद घेतला आनंद ..!

शालेयवृत्त सेवा
0

 उमरवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची निसर्गशाळा उत्साहात !




वाशिम ( शालेय वृत्तसेवा ) :

शालेय उपक्रमासोबतच वनभोजन या सहशालेय उपक्रमाचे शाळांकडून आयोजन केल्या जाते. चार भिंतीच्या आतील बंदिस्त अभ्यासक्रम एकदिवस टाळून निसर्गाच्या सानिध्यात झाडे, पशु, पक्षी, वेली यांच्याशी गुज गोष्टी करीत अनेक अनुभवांची समृद्धी हस्तगत करुन घेण्यासाठी निसर्ग शाळा हा उपक्रम घेण्यात येतो. कोरोनाचा प्रभाव असल्याने गेल्या दोन वर्षे  शाळा बंदच होती. शाळा बंद असल्यामुळे सर्व शालेय व सहशालेय उपक्रम स्थगित करण्यात आले होते. तालुका मालेगाव येथील जिल्हा परिषदेच्या उमरवाडी प्राथमिक शाळेतील चिमुकल्यांनी वनभोजन या कार्यक्रमातून निसर्ग शाळेचा मनमुराद आनंद घेतला. 


मोकळ्या रानी आणि उघड्या आभाळी मुलांनी गप्पा, गोष्टी, शालेय कविता, गाणी, स्वरचित कविता,  प्राण्यांचे हुबेहुब आवाज, नाट्य संवाद, विनोद, चुटकुले, मनोरंजक व मैदानी खेळात सहभाग घेतला. तसेच शेतीचे आधुनिक तंत्रज्ञान,  व शेतीच्या पारंपारिक तथा आधुनिक पद्धती यांची प्रत्यक्ष भेट देऊन अनुभव घेण्यात आले. विविध इयत्तांच्या व विषयांच्या अभ्यासक्रमातील घटक, उपघटकांची प्रत्यक्ष सांगड घालून शाळेतील शिक्षकांनी विविध अध्ययन अनुभती दिल्या. सौर ऊर्जा पॅनलचा सहशिक्षक संघपाल सोनोने यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी अभ्यास केला. निसर्ग शाळेत एकूण ६४ विद्यार्थी-विद्यार्थीनींनी सहभाग नोंदविला. 


शिक्षकांनी शेती करण्याच्या पद्धती व अवजारे यांच्याविषयी माहीती दिली.  हिरव्यागार वनराईच्या संगतीत खिचडी भजांसह रानभाज्यांचा पुलाव व विविध प्रकारची फळे या विशेष मध्यान्ह भोजनावर ताव मारला. सदरील उपक्रमाचे आयोजन मुख्याध्यापक  एस.एल. राठोड सहशिक्षक एस.एस सोनोने यांनी केले होते. तर मनकर्ना शिंदे मॅडम, दिनेश घुगे सर आदिंनी परिश्रम घेतले. 




"

काय पाहिले?  

औषधीयुक्त वनस्पती, पाण्याचे विविध स्त्रोत, रब्बी हंगामातील  मक्का, भुईमुग, गहू, गवत, हरभरा, हळद आदी पिकांची शेते, विविध फळांची झाडे, मातीचे प्रकार, ठिबक सिंचन, तुषार सिंचन तसेच कालव्याद्वारे पाणी पुरवठा, पाटाचे पाणी,रानटी झुडपे, विविध पक्षी आणि त्यांचे आवाज, घरटी, विविध रानभाज्या आदीं बाबींचे निरीक्षण करण्यात आले. तसेच शेंगा, बोरं, ऊसाची टिपरे,  पेरु, मधमाशांचे पोळे या रानमेव्यांचा आस्वाद घेतला."

वाचा : या शाळेने रचला इतिहास 

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)