नवीन वर्षात सुट्या अधिक !

शालेयवृत्त सेवा
0

 2023 मधील सार्वजनिक सुट्ट्या जाहीर



राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने नवीन वर्ष 2023 मधील सार्वजनिक सुट्ट्या केल्या जाहीर


पुणे ( शालेय वृत्तसेवा ):

लवकरच नवीन दिनदर्शिका 2023 ला प्रारंभ होत आहे. राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने नवीन वर्ष 2023 मधील सार्वजनिक सुट्ट्या जाहीर केल्या आहेत. नवीन वर्षात 24 सार्वजनिक सुटण्याची मेजवानी कर्मचाऱ्यांना मिळाली आहे. या सुट्ट्यात दोन सुट्ट्या रविवारी तर तीन सुट्ट्या शनिवारी येत असल्याने शासकीय कर्मचाऱ्यांचा काहीसा हीरमोड झाला आहे. 



सर्व शासकीय कार्यालय शाळा महाविद्यालय व बँकांना देखील रविवारी सुट्टी तर शनिवारी हाफ डे असतो त्यामुळे शनिवार रविवार म्हटले या कर्मचाऱ्यांसाठी आठवड्यात कामापासून सुटका असते. त्या सुट्टीच्या दिवशी कर्मचारी विरंगुळा म्हणून छंद जोपासत असतात. काही आठवड्यांची शिल्लक घर कामे जसे किराणा घर स्वच्छता आ आदी तर काही पर्यटनाचा आनंद घेतात. त्यामुळे शनिवार-रविवार हे कर्मचाऱ्यांचे आवडीचे दिवस असतात याशिवाय सण उत्सव राष्ट्रीय सण व स्थानिक प्रशासनाच्या सुट्टीकडे कर्मचाऱ्यांचे विशेष लक्ष असते. कार्यालयीन सुट्ट्यांचा ताळमेळ बसून शासकीय कर्मचारी सुट्ट्यांचा आनंद द्विगुणीत करण्याचा वेध कर्मचारी आखत असतात. येत्या 2023 मधील सार्वजनिक सुट्ट्या जाहीर झाल्याने शासकीय कर्मचारी सुट्ट्यांच्या नियोजनात व्यस्त झाल्याचे बघायला मिळत आहेत.



2023 मधील शासकीय सुट्ट्या :


◼️सोमवार : 1 मे (महाराष्ट्र दिन ) 2 ऑक्टोंबर (गांधी जयंती ) 27 नोव्हेंबर (गुरुनानक जयंती ) 25 डिसेंबर (क्रिसमस डे ) 

◼️मंगळवार 7 मार्च (होळी) 4 एप्रिल (महावीर जयंती ) 15 ऑगस्ट (स्वातंत्र्य दिन ) 19 सप्टेंबर (गणेश चतुर्थी ) 24 ऑक्टोबर (दसरा ) 14 नोव्हेंबर ( दिवाळी )

◼️बुधवार : 22 मार्च (गुढीपाडवा ) 28 जून (बकरी ईद ) 16 आगस्ट ( पारशी नूतन वर्ष ) 

◼️गुरुवार 26 जानेवारी (प्रजासत्ताक दिन ) 30 एप्रिल (रामनवमी ) 28 सप्टेंबर (ईद-ए-मिलाद ) 

◼️शुक्रवार : 7 ( गुड फ्रायडे ) 14 एप्रिल (डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती ) 5 मे (बुद्ध पौर्णिमा )

◼️शनिवार : 18 फेब्रुवारी (महाशिवरात्री ) 29 जुलै (मोहरम ) २२ एप्रिल (रमजान ईद ) 

◼️रविवार : 19 फेब्रुवारी ( छत्रपती शिवाजी महाराज जयंती ) व 12 नोव्हेंबर (दिवाळी /लक्ष्मीपूजन )

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)