गणित शिक्षिका कोमल गिरदवाड मॅडम व गणित शिक्षक जुनेद कुरेशी यांचा उपक्रम !
नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :
गणिततज्ञ श्रीनिवास रामानुज यांचा जन्मदिन अर्थात गणितदिन मुखेड येथील जिजाऊ ज्ञानमंदिरात उत्साहात साजरा करण्यात आला.
गुरुवार दि. २२ रोजी गणित शिक्षिका कोमल गिरदवाड मॅडम व गणित शिक्षक जुनेद कुरेशी सर यांच्या मार्गदर्शना खाली शाळेतील विद्यार्थ्यांनी गणित विषयाचे विविध घटकांचे उदाहरणासह स्पष्टीकरण करून आदर्श पाठांचे सादरीकरण केले. यात सोहम गुट्टे , श्रेयस भालके , रेवा गायकवाड इयता ३ री , आदित्य सिरुळे ' संचिता जुने , सोम्या तमशेटे श्रेयस पाटील इयता ४ थी , आयान शेख इयता ५ वी , सोमेश वडजे , खुशी नागेश्वर , नक्षत्र पवार ' संकेत बर्मे इयता ६ वी , नरेंद्र वडजे इयता ७वी आदी विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवून गणितीय घटकांचे अतिशय कसबदार उदाहरणासह स्पष्टीकरण करून आदर्श पाठाचे सादरीकरण केले. यामुळे सर्वांचेच लक्ष आपल्याकडे वेधून घेतले.
सर्वोत्कृष्ट सादरीकरणाचा बहुमान नक्षत्र पवार इयता ६ वी यास देण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक जगदीप जोगदंड तर प्रमुख पाहुणे म्हणून संस्थाध्यक्ष ज्ञानोबा जोगदंड उपस्थित होते. गणित तज्ञ श्रीनिवास रामानुज यांचे गणितातील योगदान या विषयी मुख्याध्यापकांनी आपले विचार मांडले तर दैनंदिन व्यवहारात व जीवनात गणिताचे महत्व याविषयी संस्थाध्यांनी आपले विचार मांडले.
कार्यक्रमाचे बहारदार सुत्रसंचलन सुजाता पांचाळ मॅडम यांनी केले . प्रास्ताविक जुनेद कुरेशी सर यांनी केले. कोमल गिरदवाड मॅडम यांनी सर्वांचे आभार मानले. यावेळी विद्यार्थ्यांसह शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी बहुसंख्येनी उपस्थित होते.
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .