वेरूळ अजिंठातील लेणी पाहून विद्यार्थ्यांनी मिळवली ऐतीहासिक माहिती..

शालेयवृत्त सेवा
0

 देवगीरी किल्ल्यावरही विद्यार्थ्यांनी केली चढाई !




नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :

मुदखेड तालुक्यातील मुगट येथील जिजामाता प्राथमिक शाळेतील पन्नास विद्यार्थ्यांनी वेरूळ आजिंठा आणि देवगीरी किल्ला अशा ऐतिहासिक वास्तू पहात माहिती घेत शैक्षणिक सहलीचा आनंद घेतला. 


जिजामाता प्राथमिक शाळेची सहल वेरूळ अजिंठा आणि दौलताबाद येथे काढण्यात आली. सर्व सहभागी शिक्षकांचे उत्कृष्ट नियोजन होते. अजिंठा लेणी, वेरूळ लेणी, देवगिरी किल्ला , घृष्णेश्वर मंदिर या स्थळांना भेटी देऊन विद्यार्थ्यांनी माहिती घेतली आणि फॉरेनर सोबत इंग्रजीमध्ये संवाद करून आनंद लुटला. 


सहलीच्या यशस्वीतेसाठी विलासराव कल्याणकर सर, जे. एन. देवठाणकर ,सुरेश भोसले, कविता हातागळे, रंजना भोसले, कनुप्रिया दरबस्तवार, ज्योती जोशी,  स्मिता सुगलेगावकर आदी शिक्षकांनी परिश्रम घेतले. आणि ही ऐतिहासिक सहल यशस्वीपणे पार पाडली.



टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)