केंद्र मोहपूरची शिक्षण परिषद सिंदगी येथे संपन्न

शालेयवृत्त सेवा
0





नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :

किनवट तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सिंदगी गाव केंद्र मोहपूर येथे शिक्षण परिषद संपन्न झाली. शालेय व्यवस्थापन समिती सदस्य अंतर्गत सर्व मुख्याध्यापक शिक्षक यांच्या उपस्थितीत शिक्षण परिषद घेण्यात आली. 


या परिषदेमध्ये निपुण भारत अंतर्गत वर्ग दोन ते पाच सर्वेक्षण ,आधार अपडेट शिल्लक काम यावर सविस्तर चर्चा झाली सिंदगी गावातील शाळा पाहून सर्व शिक्षक वृंद आनंदित झाले. शाळेला गावाचा आधार शाळेला गावाचा अभिमान इथे अनुभवायला मिळाला. विद्यार्थीच्या कृतीतून संस्कार व संस्कृती कृतीतून दिसून आली.


श्री जोशी राजेश्वर यांनी प्रास्ताविक केले, श्री वासुदेव राजूरकर यांनी मनोगत व्यक्त करुन ओमकार स्वरूप हे भक्ती गीत सादर केले.अध्यक्ष, पोलिस पाटील व शा व्य समिती सदस्य यांनीही मनोगत व्यक्त केले.


सर्व शिक्षकवृंद लाभल्याने आम्ही भाग्यवान झालो.असे उद्गार काढले.दुसऱ्या सत्रात श्री जोशी राजेश्वर यांनी निपुण भारत अंतर्गत अध्ययन अभ्यास सर्वेक्षण रुपरेषा सांगितले,तंत्रस्नेही शिक्षक श्री तामगाडगे राहूल व श्री कांबळे सर यांनी ही माहिती दिली. शाळेचे संयोजक श्री अचकुलवार सदानंद व शाळेतील सर्व शिक्षकांनी परिश्रम घेऊन शिक्षण परिषद यशस्वी केले.


टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)