जि.प.शाळा होणार आदर्श शाळा | Model School Project

शालेयवृत्त सेवा
0

शाळा होणार आदर्श

जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळण्याच्या उद्देशाने राज्यात 2026 पर्यंत आदर्श शाळा योजना सुरू करण्यात आली असून आदर्श शाळा योजनेद्वारे आता जिल्हा परिषद शाळेतील वर्गांचेही रूप बदलत आहे. या उपक्रमांतर्गत पहिल्या टप्प्यात राज्यातील 488 शाळा आदर्श होणार असून, त्यासाठी इयत्ता पहिली व दुसरीच्या वर्गांवर विशेष भर दिला जाणार आहे.या उपक्रमात एकात्मिक व द्विभाषिक पाठ्यपुस्तकांचा सुनियोजित वापर केला जाणार आहे.

आदर्श शाळा


आदर्श शाळा व स्पर्धा 

जिल्हा परिषद शाळांची स्पर्धा खासगी इंग्रजी माध्यमांच्या शाळांसोबत सुरू आहे. जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांचे गळतीचे प्रमाण रोखण्यासोबतच गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे, विद्यार्थ्यांमध्ये नावीन्यपूर्ण कौशल्ये विकसित व्हावी यासाठी  आदर्श शाळा योजना सहाय्यक ठरणार आहे.आदर्श शाळा योजनेत महाराष्ट्रातील 488 शाळांना आदर्श करण्यासाठी राज्य शासनाने प्रयत्न सुरू केले आहेत. त्यासाठी सध्या शिक्षकांचे सक्षमीकरण करण्यात येत आहे.आंतरराष्ट्रीय गुणवत्ता, पालकांचा विश्वास,पटसंख्या वाढ यासाठी आदर्शशाळा योजनेत विशेष लक्ष दिले जाणार आहे.यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये सर्वांगीण भौतिक व शैक्षणिक सोयी-सुविधा उपलब्ध करून देत शाळांसह विद्याथ्र्यांचीही गुणवत्ता वाढणार आहे.



आदर्श शाळा ही योजना इ. सन 2025 ते 26 पर्यंत राबविण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात राज्यातील 488 शाळा आदर्श केल्यानंतर दुसऱ्या टप्प्यात 67 हजार शाळा आदर्श करण्याचे काम हाती घेतले जाणार असल्याची माहिती आहे.गुणवत्ता वाढविण्याकरिता आदर्श शाळा हा उपक्रम विशेष ठरत आहे. सध्या राज्यातील 488 शाळांमध्ये या उपक्रमाची अंमलबजावणी सुरू आहे. शाळेची पटसंख्या, विद्यार्थ्यांची गुणवत्ता अशा विविध निकषांच्या आधारे शाळांची निवड करण्यात आली आहे. आदर्श शाळांसाठी  इयत्ता पहिली व दुसरीच्या शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. या प्रशिक्षणाच्या आधारावर सध्या शाळांमध्ये उपाययोजना करण्यात येत आहेत. आता या योजनेंतर्गत गुणवत्तापूर्ण विकास आराखड्यावर काम सुरू आहे.


वाचा:आता शिक्षकांच्या होणार परीक्षा

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)