खुदसिया मरियम हिच्या निबंधास उत्तेजनार्थ पारितोषिक !

शालेयवृत्त सेवा
0

 


वीर बालदिवस जिल्हास्तरीय निबंध स्पर्धा




नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :

वीर बालदिवस निमित्त आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेत वाजेगाव शिक्षण विभागातील हजरत फातेमा गर्ल्स हायस्कूल येथील विद्यार्थिनी खुदसिया मरियम हिच्या निबंधास उत्तेजनार्थ क्रमांकाचे पारितोषिक जाहीर झाले आहे. उत्तेजनार्थ क्रमांकाचे पारितोषिक दोन हजार रुपये, प्रमाणपत्र असे आहे.


विजेत्या विद्यार्थ्यांना २६ डिसेंबर रोजी, गुरुग्रंथ साहिब भवन येथे, भव्य कार्यक्रमात, मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात येणार आहे. यशवंत विद्यार्थ्यांचे आणि शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती अंजुम आरा, मार्गदर्शक शिक्षिका शेख तसनीम फातेमा यांचे शिक्षण विस्तार अधिकारी व्यंकटेश चौधरी, केंद्रप्रमुख रामेश्वर आळंदे यांनी अभिनंदन केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)