शिक्षकांच्या मूल्यांकनासाठी मराठवाड्यात ' लातूर पॅटर्न '

शालेयवृत्त सेवा
0

शिक्षकांच्या परीक्षा होणार !

विभागीय आयुक्त यांच्या उपस्थित निर्णय !

सॉफ्टवेअर क्यूआर कोड नुसार शिक्षकांची उपस्थिती

विद्यार्थ्यांचे गुणवत्ता वाढवण्यासाठी शिक्षकांच्या परीक्षा होणार !


औरंगाबाद ( शालेय वृत्तसेवा ) : 

मराठवाड्यातील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांचे मूल्यांकन करण्यासाठी लातूर पॅटर्न राबवीला जाणार आहे. लातूरचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल यांनी जिल्ह्यात राबविलेला पथदर्शी प्रकल्प
विभागात पॅटर्न म्हणून राबविण्याचा निर्णय विभागीय आयुक्तालयात झालेल्या बैठकीत घेण्यात आला. 

मराठवाड्यातील जिल्हा परिषद शाळेतील पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचे गुणवत्ता वाढवण्यासाठी शिक्षकांची एप्रिल 2023 पर्यंत परीक्षा घेण्यात येणार आहे. त्यानुसार बुधवारी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्या उपस्थितीत विभागातील जिल्हाधिकारी आणि सीईओ ची बैठक झाली. यावेळी विभागात शिक्षणाची गुणवत्ता वाढविणे शासनाकडून उपलब्ध साधने आणि एनजीओ शिक्षण विभागाच्या सहकार्याने वाचन - लेखन - गणित यावे यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

 


अध्ययन स्तर शोधल्यावर उपाय करण्याचा डाटा समोर येईल त्यानंतर शिक्षकांना प्रशिक्षित करून अपडेट करण्यात येईल. शिक्षकांना अपडेट ठेवण्यामागचा उद्देश आहे तसेच चौथी मधील 30 टक्केच विद्यार्थ्यांना येते हे प्रमाण 70 टक्केवर जाणे गरजेचे आहे. त्यासाठी दहा मुद्द्यावर विशेष लक्ष असणार आहे. विद्यार्थ्यांची मॉनिटरिंग करण्यात येणार आहे. 


शास्त्रज्ञ इतिहास एस्ट्रॉनॉमी गणित क्रीडा सेल्फ डिफेन्स हे विषय विद्यार्थ्यांना आले पाहिजेत. शिक्षकासाठी हजेरीपट बंधनकारक करण्याचा प्रयत्न पुढच्या शैक्षणिक वर्षात करण्यात येणार आहे. सॉफ्टवेअर क्यूआर कोड नुसार हजेरी अपडेट करण्यासाठी विचार होऊ शकतो. यंदाच्या शैक्षणिक वर्षातच शिक्षकांची परीक्षा घेण्यात येईल ऑगस्ट 2022 मध्ये लातूर जिल्हा परिषदेने गुणवत्ता वाढीसाठी प्रयोग केला होता तो प्रयोग आता मराठवाड्यातील आठ ते दहा हजार जिल्हा परिषद शाळा व सुमारे 35 हजार शिक्षकांसाठी राबविण्यात येणार आहे असे सांगण्यात आले.



 लातूरमध्ये विद्यार्थ्यांमध्ये झाला बदल :

          ऑगस्ट महिन्यात लातूरमध्ये जिल्हा परिषद शाळेतील 45 टक्के विद्यार्थ्यांना भागाकार येत नव्हता आता 85 टक्के विद्यार्थी गणित सोडवण्यापर्यंत आले आहेत 31 डिसेंबर पर्यंत शंभर टक्के पर्यंत हे प्रमाण जाणे अपेक्षित आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)