आयकर कायद्यानुसार बचत करा !

शालेयवृत्त सेवा
0

 



आयकर कायद्यानुसार बचत कशी करावी ?


सेक्शन 24 B :


गृह कर्ज व्याज यात येते. जास्तीत जास्त 200000 ( दोन लाख ) मर्यादा आहे.




सेक्शन 80 B :


या सेक्शनची मर्यादा 150000 आहे.खालील प्रकारच्या बचती मान्य केल्या जातात.


1. सर्व प्रकारची विमा हप्ते.


2. पी.एफ / जी.पी.एफ.


3. एन.एस.सी.


4. गृह कर्ज मर्यादा.


5. पी.पी.एफ.


6. शैक्षणिक फीस ( दोन मुलांपर्यंत )


7. म्युच्युल फंड ( टॅक्स सेव्हर )


8. सुकन्या योजना


9. नवीन घर खरेदी स्टॅम्प ड्युटी


10. पी.एल.आय.


11. गटविमा


12. व्यवसाय कर


वरील वेगवेगळ्या प्रकारची बचत असेल तर सर्व मिळून 150000 लाख रु पर्यंत मर्यादा आहे.



सेक्शन 80 D :


मेडिकल सुविधा साठीचा विमा रु. 25000  ची बचत माफ तसेच जेष्ठ नागरिक यांचा विमा असेल तर तो वेगळा खर्च 25000 रु माफ होतो.


सेक्शन 80 E :


जर आपले पाल्य उच्च शिक्षण घेतले असेल आणि शैक्षणिक कर्ज घेतले असेल तर त्यावरील व्याज माफ होते.


सेक्शन 80 G :


जर आपण कोणत्याही शासकीय योजनेत देणगी दिली तर ती पूर्णपणे माफ आहे.


पण जर अशासकीय संस्थांना देणगी दिली तर देणगीच्या 50% रक्कम माफ होते.


अशासकीय संस्थांना देणगी देण्याआधी खालील बाबींची पडताळणी करा.


👉 अशासकीय संस्था 80 G नुसार मान्यताप्राप्त आहे का?


👉 पावतीवर तसा उल्लेख आहे का। ?


👉 पावतीवर संस्थेचा पॅन नंबर नोंदविलेला आहे का ?


👉 आताच्या नवीन नियमानुसार ती संस्था आपल्याला ऑनलाईन सर्टिफिकेट देणार आहे का ?


  या प्रश्नाकडे नीट लक्ष द्या अन्यथा लाभ मिळणार नाही.




सेक्शन 80 U :


जर कर्मचारी दिव्यांग असेल आणि 80% पेक्षा कमी दिव्यांगत्व असेल तर त्यांना 75000 रु. ची सूट मिळते.


जर दिव्यांगत्व 80% पेक्षा जास्त असेल तर अशा कर्मचाऱ्यांना 125000 रु.ची सूट मिळते.


सेक्शन 80 EEB :


जर आपण इलेक्ट्रिक वाहन खरेदी केले असेल व त्यासाठी कर्ज घेतले असेल तर त्या कर्जावरील व्याज यामध्ये माफ होते.



सेक्शन 80CCD :


1961 च्या आयकर कायद्याच्या कलम 80CCD मध्ये NPS सारख्या सरकारी पेन्शन प्रणालींमध्ये योगदान देणाऱ्या व्यक्ती आणि व्यवसायांसाठी कर कपातीची तरतूद आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)