नागपूर ( शालेय वृत्तसेवा ) :
राज्य राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षक संघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने नागपूर येथे ग्रामीण विकास मंत्री ना.गिरीश महाजन यांना शिष्टमंडळाने भेटून शिक्षकांच्या विविध प्रश्न सोडवण्यासाठी निवेदन दिले या शिष्टमंडळाचे नेतृत्व राज्याचे राज्याध्यक्ष मा.सुभाष जिरवणकर, राज्य प्रवक्ता मा.सुनील गुरव सहचिटणीस माधव वायचळ, नागपुर अध्यक्ष. मा.सुनील नायक सरचिटणीस बळीराम चापले, शारदा रोशन खडे नरहरी नांजेवार , शिष्टमंडळाने मंत्रिमंडळ यांची भेट घेऊन निवेदन दिले यावेळी राज्यातील शिक्षकांचे सर्व प्रश्न लवकरात लवकर सोडवू असे आश्वासन शिष्टमंडळांस देण्यात आले .
यावेळी प्रमुख मागण्या करण्यात आल्या -
1) राज्य /राष्ट्रीय / जिल्हा पुरस्कार प्राप्त शिक्षकांच्या २०१४पासुन बंद असलेल्या जादा वेतनवाढी पुर्ववत सुरू करणे.
2) जुनी पेन्शन योजना सुरू करणे.
3) कायम स्वरुपी ओळखपत्र देणे, जिल्हांतर्गत बदल्या मध्ये संवर्ग १मध्ये समाविष्ट करणे.
4) केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी ज्यांच्या पदोन्नती मध्ये या शिक्षकांना प्राधान्य देऊन १०%जागा राखीव ठेवणे,रेल्वे व बस सवलत पास देणे,
5)राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षकांची यादी जाहीर करून वितरीत करणे,
6) न्यायालयाने जादा वेतनवाढी मंजुर करण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी करणे,
7) विविध शासकीय समितीवर निमंत्रित सदस्य म्हणुन नियुक्ती करणे,
8) शिक्षकांचे मासिक वेतनासाठी आर्थिक तरतुद नियमित वेळेवर जिल्हा परिषदेला पाठवणे,
9)नोव्हेंबर 2022च्या वेतनासाठी आर्थिक तरतुद अपुरी पाठवण्यात आली आहे त्यासाठी लवकर निधी जिल्हास्तरावर पाठवणे
10 )राज्यातील शिक्षक , केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी,विषय शिक्षक यांच्या रिक्त जागा भरणे
11) 2005पुर्वी नियुक शिक्षकांची अंशदायी पेन्शन योजना अंतर्गत कपात झालेली रक्कम भविष्य निर्वाह निधी खात्याकडे वर्ग करण्यासाठी निधी उपलब्ध करून देणे .या व इतर अन्य मागण्याची निवेदन शिष्टमंडळीने दिले .
या सर्व मागण्यांचा विचार करून राज्यातील सर्व शिक्षकांचे प्रश्न लवकरात लवकर सोडवणार अशी आश्वासन मंत्री ना.गिरीश महाजन यांनी दिले याप्रसंगी सरचिटणीस बळीराम चापले, नुरहरी लांजेवार ,सचिन चव्हाण,मनोज रहांगडाले,पक्षभानढोक,चित्रा मजुमदार,शुभांगी पोहरे,किर्ती पालटकर , प्राजक्ता रणदिवे, मनीषा शहाकार,शुभ्रा राॅय ,माया गेडाम ,रंजना सोरमारे,सतिश पुंड , गोविंद ढाले,प्रशांत जांभुळकर संघपाल मेश्राम,क्रिष्णा गवळी , ओंकारनाथ दाणी ,देवेंद्र गाठे,मनिष शेटे ,यासह नागपुर विभागीय ,जिल्हा कार्यकारणी ,तसेच वर्धा ,गोंदिया , चंद्रपुर .व पदाधिकारी उपस्थित होते.
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .