शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांचा सुयोग येथे पत्रकारांशी संवाद

शालेयवृत्त सेवा
0

◼️शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी करीत असलेल्या विविध उपाययोजना दिली माहीती 



नागपूर ( शालेय वृत्तसेवा ) : 

शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांनी आज येथील सुयोग पत्रकार निवासस्थानी सदीच्छा भेट देत पत्रकारांशी संवाद साधला. सुयोग पत्रकार निवासस्थानी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे संचालक (प्रशासन) हेमराज बागुल, मराठी भाषा विभागाचे विभागीय सहायक संचालक श्री. सुर्यवंशी, सुयोग पत्रकार निवासस्थान प्रमुख विवेक भावसार आदी उपस्थित होते.


भेटीदरम्यान मंत्री श्री. केसरकर यांनी सुयोग निवासस्थान येथील पत्रकारांच्या सुविधांबाबत माहिती घेतली. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधत शालेय शिक्षण विभाग शिक्षक, विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी करीत असलेल्या विविध उपाययोजना माहीती दिली.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)