गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी भरीव प्रयत्नांची गरज - नागोराव जाधव

शालेयवृत्त सेवा
0

 



द्वितीय सत्रातील केंद्रस्तरीय शिक्षण परिषदांना प्रारंभ; शेवडी (बा) या केंद्राची  शिक्षण परिषद उत्साहात  संपन्न


नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :

शालेय शिक्षणाच्या अध्ययन अध्यापनाच्या प्रक्रियेत विद्यार्थी केंद्रस्थानी असतो. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हे शिक्षणाचे प्रमुख उद्दिष्ट आहे.  गुणवत्तापूर्ण शिक्षण देणे गरजेचे आहे, त्यासाठी शिक्षकांच्या भरीव प्रयत्नांची गरज आहे अशी अपेक्षा दक्षिण विभागातील शेवडी बाजीराव केंद्राच्या शिक्षण परिषदेचे अध्यक्ष नागोराव जाधव यांनी व्यक्त केली. केंद्रांतर्गत जिल्हा परिषदेच्या बोरगाव कोल्हा येथील प्राथमिक शाळेत सर्व व्यवस्थापनाच्या शाळांतील सर्व शिक्षकांची केंद्रस्तरीय शिक्षण परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी सरपंच विमलताई सोनटक्के, उपसरपंच अनुसयाबाई घाटोळ, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शिवाजी जाधव,  संतोष घाटोळ, रोहिदास घाटोळ, तुळवाळे महाजन, गिरीधर घाटोळ, श्रीराम कदम, गणेश घाटोळ, विनोद मोरे, लक्ष्मण घाटोळ, राघोजी निरडे तसेच शेवडीचे मुख्याध्यापक आनंदा नरवाडे सर, दगडगावचे मुख्याध्यापक अशोक राऊत, बेटसांगवीचे मुख्याध्यापक विजय राणे, जवळ्याचे मुख्याध्यापक ढवळे जी. एस. यांची उपस्थिती होती.

        

डायटच्या सूचनेनुसार २०२२-२३ या  शैक्षणिक वर्षातील  शिक्षण परिषद  उत्साहात आणि आनंददायी वातावरणात पार पडली. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, सरस्वती  यांच्या प्रतिमा पूजनाने व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त भाषण स्पर्धा व निबंध स्पर्धेमध्ये तालुकास्तरावर क्रमांक पटकविणाऱ्या विद्यार्थिनी  श्वेता सूर्यवंशी, प्रा. शा. दगडगाव व रिद्धी वानखेडे, प्रा शा बेटसांगवी -1 या विद्यार्थ्यांना बक्षीस देऊन गौरविण्यात आले.  बोरगावचे मुख्याध्यापक मारोती उत्तरवार यांनी प्रस्ताविक पर भाषणात शाळेची सांख्यिकी व राबविल्या जाणाऱ्या उपक्रमाविषयी माहिती दिली. त्यानंतर दीनदयाळ माध्यमिक विद्यालय बेटसांगवी आनेराये यांनी इयत्ता पाचवीच्या वर्गावर अन्नघटक हा पाठ प्रयोगातून विज्ञान या सदराखाली सादरीकरण केला. डायटच्या नियोजनाप्रमाणे निष्ठा 4.1 याविषयी सविस्तर मार्गदर्शन चंद्रकांत लामदाडे , शिक्षक सक्षमीकरण सोनकांबळे एन. जी. यांनी तर निपुण भारत कदम एच. एस. यांनी केले. परिषदेचे अध्यक्ष तथा केंद्रप्रमुख नागोराव जाधव यांनी प्रशासकिय आढावा घेऊन गुणवतापुर्ण शिक्षणासाठी विद्यांजली नोंदणी, आधार अपडेट, शिष्यवृत्ती, मोफत गणवेश, उपस्थिती भत्ता वाटप, पीएम पोषण, मूल्यमापन नोंदी, भाषा पेटी,  गणित पेटी वापर अशा विविध विषयांवर सविस्तर मार्गदर्शन केले. 

      

शिक्षण परिषदेचे सूत्रसंचालन ढवळे जी. एस. यांनी केले तर आभार प्रदर्शन नरवाडे यांनी केले. उपस्थितांसाठी  सुरूची भोजनाच्या व्यवस्थेने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. सदर शिक्षण परिषदेस अंतर्गत चे मुख्याध्यापक व केंद्रांतर्गत शिक्षक , शिक्षिका हे मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी यशवंत गोडबोले, आशाबाई गोडबोले, रतनबाई घाटोळ, पांडूरंग घाटोळ, कालीदास घाटोळ, शिवाजी गव्हाणे, गोपीनाथ घाटोळ, युवराज घाटोळ, बालाजी घाटोळ, दिगांबर सोनटक्के आदींनी परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)