वैजाली येथे शिक्षण परिषद उत्साहात संपन्न

शालेयवृत्त सेवा
0

 



नंदूरबार ( शालेय वृत्तसेवा ) :           

शहादा तालुक्यातील प्रकाशा केंद्राची शिक्षण परिषद जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वैजाली येथे उत्साहात संपन्न झाली. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले व शहीद बालक्रांतिकारक शिरीषकुमार यांच्या प्रतिमीचे पूजन प्रकाशा बिटचे शिक्षण विस्तार अधिकारी युवराज मोरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी वैजाली गावाचे सरपंच सुरेखा ठाकरे, उपसरपंच गणेश पाटील, केंद्रप्रमुख राजेंद्र धनगर, शाळा व्यवस्थापन अध्यक्ष प्रवीण पाटील, मुख्याध्यापक सुदाम पाटील, पंचायत समिती शहादा बीआरसी विषयतज्ञ मिलिंद देसले, केंद्रातील सर्व शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक उपस्थित होते. 


जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थाचे अधीव्याख्याता डॉ. वनमाला पवार यांनी शिक्षण परिषदला भेट देऊन मार्गदर्शन करताना सांगितले की, विद्यार्थी हा ज्ञानाचा अथांग महासागर आहे. थोर विद्वान, ज्ञानाचा वारसा पुढे चालवण्याचा ज्ञानवंत करण्याचा गुणवत्ताचा खजिना विद्यार्थ्यांपर्यंत पोहचला पाहिजे असे मत व्यक्त केले. जिल्हास्तरावरून देण्यात आलेला माहे सप्टेंबर - नोव्हेंबर २०२२ चा मागोवा व्हिडीओ पीपीटी पाहून विषय उजळणी केंद्रप्रमुख राजेंद्र धनगर यांनी करून दिली. 


जिल्हास्तरावरून देण्यात येणाऱ्या पीपीटीवर सविस्तर चर्चा करून ज्या अध्ययन निष्पत्ती मध्ये विद्यार्थी मागे आहेत. भाषा व गणित  अध्ययननिष्पत्ती घेऊन गटकार्याच्या माध्यमातून त्यावर चर्चा करून  दिलेल्या नमुन्यांच्या आधारे नियोजन दर्पण भामरे यांनी दिली व अध्ययननिष्पत्ती आधारित तयार केलेले नियोजन गटाने सादर करावे . देण्यात आलेली पीपीटी द्वारे प्रभावी वर्गप्रक्रिया व वर्गरचना हा विषय समजून घेऊन यादृष्टीने वर्गपातळीवर याचे नियोजन कसे करता येईल याबाबत विस्तृत चर्चा करून दिशा महेशकुमार चौधरी यांनी दिली. जिल्हास्तरावरून देण्यात येणाऱ्या पीपीटीच्या मार्गदर्शक मुद्द्यांच्या आधारे, तालुकास्तर डाएने केलेल्या मार्गदर्शनानुसार नाविन्यपूर्ण अध्यापन पद्धती आधारीत एका पाठाचे सादरिकरण उमेश विसपुते यांनी सादरीकरण केंद्रात झाले. 


दिक्षा अँपची माहिती दिली. जिल्हास्तरावरून देण्यात येणाऱ्या पीपीटी नुसार केंद्रात पालक परिषद प्रक्रिया अंमलबजावणी झालेल्या किमान दोन शाळांनी पीपीटी मध्ये दिलेल्या मुद्द्यानुसार पालक परिषद प्रक्रियेसंदर्भात अनुभव सादरीकरण  केले. केंद्रप्रमुख आणि सिआरजी सदस्य यांनी एकत्रित सिआरजी बैठक घेऊन केंद्रातील चांगल्या बाबी व अडचणींवर चर्चा करून पुढीलपैकी एक विषय, केंद्र गरजा आधारित विषय ठरवण्यात आला. व चर्चा केली. निपून भारत अध्ययन अभ्यास सर्वेक्षण बाबत विश्वास माळी यांनी दिली. प्रशासकीय कार्य विषयी शिक्षण विस्तार अधिकारी युवराज मोरे यांनी गतिमानता व उपडेटशन, उपस्थिती, व रेकार्ड आद्ययावत, सातत्यपूर्ण सर्वकष मूल्यमापन नोंदी, शाळाबाह्य विद्यार्थी गुणवत्ता शिक्षण याविषयी माहिती दिली. 


शिक्षण परिषद प्रतिसादाची एकच लिंक असून केंद्रप्रमुख व शिक्षण परिषदेस उपस्थित राहणारे अधिकारी, कर्मचारी, स्वंयसेवी संस्था प्रतिनिधी , शिक्षक,  मुख्याध्यापक यांच्यासाठी लिंक अभिप्राय गुगल लिंक ह्याच दिलेल्या वेळेत भरण्यात आली. शिक्षण परिषदचे प्रास्ताविक उषा पाटील यांनी केले. सूत्रसंचालन व उपस्थितांचे आभार चंदू पाटील यांनी केले. शिक्षण परिषद संपन्न होण्यासाठी मुख्याध्यापक सुदाम पाटील, शिक्षक भरत पावरा, राजू मोरे, चंदू पाटील, उषा पाटील, गोपाल गावीत यांनी परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)