केंद्र निळा शिक्षण परिषद संपन्न

शालेयवृत्त सेवा
0



_विद्यार्थ्यांच्या विविध कला गुणांचे झाले कौतुक_


नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा एकदरा केंद्र निळा ता.जि.नांदेड येथे शिक्षण परिषद संपन्न झाली. परीषदेच्या अध्यक्षस्थानी केंद्रप्रमुख श्री विश्वम्भर संभाजीराव धोपटे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय मुख्याध्यापक पोहरे सर,पदोन्नत मुख्याध्यापक श्री पडगिलवार सर,श्री गोवंदे सर,श्री वाघमारे सर आणि श्रीमती वाटेगावकर मॅडम उपस्थित होत्या.


शाळेचे उच्चश्रेणी मुख्याध्यपक आदरणीय श्रीकांत कुलकर्णी सर यांच्या हस्ते उपस्थित सर्व मान्यवरांचे शाल आणि पुष्पहार देऊन स्वागत करण्यात आले. परिषदेचे प्रास्ताविक श्री धोपटे सर यांनी केले. प्रस्तुत शसळेतील विदर्थिनींनी स्वागत गीत गायिले,आणि इयत्ता पाहिलेतील विध्यार्थिनी ने स्वयंस्फूर्तीने एक बडबड गीत गाऊन एक उत्साही वातावरण निर्माण केले त्या मुलींची सर्वांनी स्तुती केली.या गितावर श्री पडगिलवार सर यांनी 50 रुपयांचे बक्षीस दिले.


एकदरा टीम ची एकजूट आणि विद्यार्थ्यांसाठी कोरोना काळानंतर विदयार्थी शाळेत टिकवण्यासाठी आणि त्यांच्या कलात्मक गुणांना वाव देण्यासाठी अहोरात्र झटणाऱ्या सर्व शिक्षकांच्या वतीने तयारी करून घेतलेली. 'अति तेथे माती ' ही नाटिका अविश्व्सनीय आणि प्रचंड आत्मविश्वासाने श्रीमती कविता हुंडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली विदयार्थ्यांनी उत्कृष्ट रित्या सादर जेली.या नाटीकेतील *दवंडी* आणि इतर सर्व अभिनय अप्रतिम होते.

या नाटिकेसाठी अनेक शिक्षकानी बक्षीसे दिले. सर्व सहभागी विध्यार्थी आणि सर्व शिक्षक यांचे मनोबल वाढवण्यासाठी कौतुकाची थाप असेल.यावरून सर्व टीम  विद्यार्थ्यानी प्रचंड मेहनत घेत असल्याचे दिसून आले. शाळेचे कर्तव्यदक्ष मुख्याध्यापक आदरणीय श्री श्रीकांत कुलकर्णी सर आणि त्यांच्या सर्व टीम चे मान्यवरांकडून खूप खूप अभिनंदन आणि कौतुक करण्यात आले.


शिक्षण परिषद म्हटले की त्यात शिक्षक आणि अधिकारीच बोलत असतात परंतु आजच्या या अगळ्या वेगळ्या शिक्षण पारिषदेत विध्यर्थ्याना बोलके करण्यासाठी योग्य आणि अचूक संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल संयोजकांचे कौश्यल्य दिसून आले. आजच्या नियोजित तासिका श्रीमती धोत्रे मॅडम,यांनी पूर्ण केल्या. परिषदेचा समारोप आणि प्रशासकीय सूचना आदरणीय धोपटे सर यांनी दिल्या. तर सर्व मुख्याध्यापक यांच्या वतीने आपले अनुभव आणि मार्गदर्शन श्री पडगिलवार यांनी थोडक्यात केले.


या परिषदेचे आपल्या नेहमीच्या आणि भारदस्त शैलीत श्री निलेश गोधने सर यांनी सूत्रसंचालन केले तर आभार श्री केशव पतंगे सर यांनी मानले. मागील साडेचार वर्ष्यापासून निळा केंद्रात जितके गटसंमेलन आणि शिक्षण परिषद झाल्या त्या सर्वामध्ये आज स्वरूची भोजनामुळे विक्रम मोडीत काढत अतिशय सुंदर नियोजन आणि भोजन देऊन एकदरा शाळेने विक्रम प्रस्थापित केला. श्री कुलकर्णी सर यांनी भोजनापूर्वी विबंडनात्मक श्लोक सादर केले.



टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)