केंद्रस्तरीय शिक्षण परिषद-केंद्र मारेगाव (व) उत्साहात संपन्न

शालेयवृत्त सेवा
0

 

जि.प.प्रा.शाळा माळबोरगाव तांडा येथे केले होते आयोजन




   

नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) : 

      क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून यावेळी मान्यवरांच्या शुभहस्ते  पुष्पहार अर्पण करण्यात आले. जि.प.प्रा.शाळा माळबोरगाव शाळेतील विध्यार्थ्यांनी "तुम्ही गुलाब या जन मनातले"हे स्वागत गीत सुंदर आवाजात गायिले.  सदर केंद्रस्तरीय शिक्षण परिषदेचे प्रास्ताविक जि.प.प्रा.शा.माळबोरगाव शाळेचे मुख्याध्यापक श्री. सुनील जाधव सर यांनी केले. जि. प.प्रा. शाळा. मारेगाव (व) शाळेचे उपक्रमशील आदर्श शिक्षक श्री.सुरेश पाटील सर यांनी सुत्रसंचालन  केले.


       केंद्रस्तरीय शिक्षण परिषदेचे अध्यक्ष तथा मारेगाव (व)केंद्राचे केंद्रप्रमुख श्री. रमेश खुपसे सर,राजगडतांडा शाळेचे मुख्याध्यापक श्री.गंगाधर पुलकुंटवार सर,निचपूर शाळेचे मुख्याध्यापक श्री.दिपक डंबाळे सर शा.व्य.समिती माळबोरगाव अध्यक्ष दत्ता बुरकूले साहेब , ग्रामपंचायत सदस्य प्रदिप राठोड साहेब ,शिक्षणप्रेमी तथा माजी उपसरपंच श्री.संतोष राठोड साहेब  वरील सर्व मान्यवरांचा सत्कार जि.प.प्रा.शाळा माळबोरगाव तांडा व जि.प.प्रा.शाळा पितांबरवाडी शाळेच्या संयुक्त विद्यमानाने माळबोरगाव शाळेचे मुख्याध्यापक श्री.सुनील जाधव सर,उपशिक्षक श्री.खुशाल चव्हाण सर,पितांबरवाडी शाळेचे मुख्याध्यापक श्री.कविराज घुले सर उपशिक्षक श्री.मारोती भोसले यांच्या हस्ते पुष्पहार देऊन करण्यात आला.

           

त्यांचबरोबर केंद्राअंतर्गत येणाऱ्या सर्व जि. प. शाळेचे मुख्याध्यापक तसेच खासगी अनुदानित शाळेच्या मुख्याध्यापक यांचा पुष्पहार देऊन स्वागत करण्यात आले. शिक्षण परिषद नियोजन व विषयानुरूप मार्गदर्शन 2 री ते 5 वी निपुण भारत अंतर्गत अध्ययन अभ्यास सर्वेक्षण रूपरेषा... याविषयी मा. केंद्रप्रमुख रमेश खुपसे सर यांनी याविषयी मार्गदर्शन केले.


2 री ते 5 वी निपुण भारत अंतर्गत अध्ययन अभ्यास सर्वेक्षण विषय भाषा.... याविषयी विनायक मुंडे सर यांनी टॅबच्या साह्याने खूप छान आणि विस्तृत स्वरूपात मार्गदर्शन केले.. 2 री ते 5 वी निपुण भारत अंतर्गत अध्ययन अभ्यास सर्वेक्षण विषय गणित... याविषयी श्री रुपेश मुनेश्वर सर यांनी गणित विषयासंदर्भातील निपुण भारत अध्ययन शिक्षकांची विद्यार्थ्यांची भूमिका अभ्यासपूर्ण मार्गदर्शन केले.


2 री ते 5 वी निपुण भारत अंतर्गत अध्ययन अभ्यास सर्वेक्षण विषय परिसर अभ्यास... याविषयी श्री चंद्रशेखर सर्पे सर यांनी विद्यार्थ्यांनी करायची निरीक्षण व परिसर अभ्यासाच्या माध्यमातून शिक्षक व विद्यार्थी  त्यांच्या व्यवहारी ज्ञान व आरोग्य विषयी माहिती सांगून मी पण भारत अंतर्गत परिसर अभ्यास ची प्रश्नपत्रिका व करावयाची मूल्यमापन याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.


          पितांबरवाडी शाळेचे उपशिक्षक श्री.मारोती भोसले यांनी उपस्थित सर्व मान्यवर,मुख्याध्यापक तसेच सहशिक्षक बंधू-भगिनीची आभार मानले. सर्वांना जि प प्रा शा.माळबोरगाव व पितांबरवाडी शाळेच्या वतीने स्नेहभोजन देण्यात आले.



टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)