शिष्यवृत्ती परीक्षा आवेदनपत्र भरण्यास मुदतवाढ |Extension of time to fill scholarship examination application form

शालेयवृत्त सेवा
0

  पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ५ वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ८ वी) आवेदनपत्र भरण्यास मुदतवाढ 


पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा

(इ. ५ वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ८ वी) दि. १२ फेब्रुवारी, २०२३ रोजी महाराष्ट्र राज्यातील सर्व

जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी घेण्यात येणार आहे. सदर परीक्षेची अधिसूचना दि. १६/११/२०२२ रोजी परीक्षा परिषदेच्या

www.mscepune.in व https://www.mscepuppss.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.



सदर परीक्षेचे ऑनलाईन आवेदनपत्र भरणेकरीता दि. १६ नोव्हेंबर ते १५ डिसेंबर, २०२२ या कालावधीत

मुदत देण्यात आलेली होती. तथापी शाळांना शाळा माहिती प्रपत्र व ऑनलाईन आवेदनपत्र भरणेकरीता अंशत:

बदल करून दि. २० डिसेंबर, २०२२ पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे. सदर प्रसिध्दीपत्रक या पत्रासोबत जोडण्यात येत आहे. 

सोबत प्रसिध्दीपत्रक

👉शाळांना अनुदानासाठी ११६० कोटींच्या खर्चास मंत्रिमंडळाची मान्यता 

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)