जवळ्यात संविधान गौरव दिन उत्साहात साजरा

शालेयवृत्त सेवा
0

 



चिमुकल्यांच्या जयजयकार रॅलीने गावकरी प्रभावीत; संविधान दिनानिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन


नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :
भारतीय संविधानातील मूलतत्वांची व्याप्ती आणि सर्व समावेशकता सर्व विद्यार्थ्यांना समजावी तसेच घटनेतील मूलतत्वे विद्यार्थ्यांच्या मनावर कोरली जावीत यासाठी संविधानाचा परिपूर्ण परिचय विद्यार्थ्यांना होणे आवश्यक आहे. भारतीय संविधान दिनाच्या निमित्ताने भारतीय संविधानाविषयी जाणीवजागृती आणि त्यातील मूलतत्वांचा विद्यार्थ्यांच्या जीवनात जबाबदार, सुजाण आणि सुसंस्कृत नागरिक होण्याच्या दृष्टीने अत्यंत सजगतेने तसेच आकलनपूर्वक अंगिकार व्हावा या उदात्त दृष्टीकोनातून सर्व शाळा, महाविद्यालयांतून संविधान दिवस साजरा करण्यात येतो. याचे औचित्य साधून आणि प्रशासनाच्या आदेशानुसार जवळ्याच्या जिल्हा परिषद शाळेत संविधान गौरव दिन साजरा करण्यात आला. 

यावेळी शाळेचे मुख्याध्यापक ढवळे जी. एस., सहशिक्षक संतोष घटकार, सरपंच कमलताई शिखरे, माजी सरपंच कैलास गोडबोले, मारोती चक्रधर, महेश शिखरे, चांदू गोडबोले, बालाजी तेलंगे, हैदर शेख,  कमल गच्चे आदींची उपस्थिती होती. 

           
७४ व्या भारतीय संविधान दिनानिमित्त शाळेत आणि ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते भारतीय संविधानाच्या प्रतीचे आणि घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूष्पपूजन करण्यात आले. त्यानंतर प्रास्ताविकेचे सामुदायिक वाचन करण्यात आले. तसेच २६/११  दहशतवादी हल्ल्यातील शहिदांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली चिमुकल्यांनी डोक्यावर प्रत आणि प्रतिमा घेऊन गावभर संविधान रॅली काढली. यावेळी 'भारतीय संविधान दिनाचा - विजय असो!, 'संविधान दिन - चिरायु होवो!' या घोषणांच्या जयजयकार रॅलीने गावकरी प्रभावीत झाले.  

दरम्यान, ठिकठिकाणी रॅलीचे स्वागत करण्यात आले. हनुमान मंदिर परिसरात वरच्या गल्लीजवळ मीरा मठपती, कमल मठपती, साहेब शिखरे, बुद्ध विहारात सुलोचना गच्चे तर सम्राट अशोक चौकात पांडुरंग गच्चे आणि मनिषा गच्चे यांनी पुष्पवंदन‌ करून स्वागत केले. त्यानंतर इयत्ता तिसरी ते सातवीसाठी निबंध स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, हस्ताक्षर स्पर्धा संपन्न झाल्या.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)