अमृत महोत्सवी मराठवाडा मुक्ती संग्राम दिना निमित्त केंद्रस्तरीय वक्तृत्व स्पर्धा

शालेयवृत्त सेवा
0

 



नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :

अमृत महोत्सवी मराठवाडा मुक्ती संग्राम दिना निमित्त केंद्र निळा च्या वतीने आज 17 नोव्हेंबर 2022 रोजी के.प्रा. शाळा निळा येथे मा.शिक्षण विस्तार अधिकारी श्रीमती कौठेकर मॅडम बीट निळा आणि केंद्रप्रमुख श्री धोपटे व्ही.एस. यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेड जिल्ह्यातील व्यक्तींचे मराठवाडा मुक्तीसंग्राम लढ्यातील योगदान या विषयाला अनुसरून दोन गटात स्पर्धा घेण्यात आली.


या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा.शाळा पुयनी चे पदोन्नत मुख्याध्यापक श्री पडगिलवार सर तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रा.शाळा पिंपरी चे पदोन्नत मुख्याध्यापक श्री वाघमारे सर,केंद्रीय मुख्याध्यापक श्री पोहरे सर,लिंबगाव च्या जाधव मॅडम,तळणी च्या ढगे मॅडम, मरळक चे जाधव सर,पतंगे सर, मोखण्डपल्ले मॅडम उपस्थित होते. तर परीक्षक म्हणून लिंबगाव हायस्कूल चे श्री गंगाधर सावळे सर आणि प्रा.शाळा एकदरा येथील शिक्षिका हुंडेकर मॅडम यांनी जबाबदारी पार पाडली.


प्राथमिक गट वर्ग पहिली ते सहावी यामध्ये सहभागी स्पर्धक के.प्रा.शाळा निळा येथील यश माधव हिंगोले प्रा.शा.पिंपरी म. कु.शुभांगी विजय पोहरे प्रा.शाळा तळणी गजानन रंगनाथ सूर्यवंशी प्रथम क्रमांक प्रा.शा.एकदरा कु.गौरी आत्माराम आरसुळे प्रा.शा.पुयनी कु.वेदिका श्रीधर पावडे  यात एकूण 5 शाळांनी सहभाग नोंदवला. या गटातून प्रा.शाळा तळणी येथील गजानन रंगनाथ सूर्यवंशी हा विजेता ठरला.


उच्च प्राथमिक गट 7 ते 10 वि या गटातून सहभागी के.प्रा.शाळा निळा कु.पुजा भगवान कऱ्हाळे प्रा.शाळापुयनी कु.गौरी प्रतापराव पावडे प्रा.शाळा मरळक बु. श्रावणी तुकाराम शिंदे. प्रा.शाळा पिंपरी म. धनश्री मुंजाजी जोगदंड प्रा.शाळा एकादरा कु.संध्याभागवत आरसुळे जिल्हा परिषद हायस्कूल लिंबगाव कु.दिक्षा शंकर पोहरे गुण. या गटातून स्पर्धकांनी सहभाग नोंदवला या गटातून पुयनी शाळेच्या कु. गौरी प्रताप पावडे ही विजयी ठरली.


दोन्हीही गटातील विजेत्यांना गजानन रंगनाथ सूर्यवंशी आणि गौरी प्रताप पावडे विध्यार्थ्यांना केंद्रीय शाळा निळा च्या वतीने पुष्पगुछ आणि पेन आजचे परीक्षक श्री गंगाधर सावळे सर यांच्या वतीने प्रत्येकी शंभर रुपये, दुसरे परीक्षक हुंडेकर मॅडम यांचे यजमान पतंगे सर यांच्या वतीने प्रत्येकी शंभर आणि आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री पडगिलवार सर यांच्या वतीने प्रत्येकी शंभर रुपये बक्षीस देण्यात आले. या कार्यक्रमाचे संचलन श्री पोहरे सर यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री केशव पतंगे सर यांनी केले.आजच्या विजेत्या स्पर्धकांना तालुका स्तरीय स्पर्धेसाठी केंद्र निळा च्या वतीने आणि मा.कौठेकर मॅडम आणि मा.धोपटे सर यांच्या ही वतीने खूप खूप शुभेच्छा दिल्या.



टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)