मौलाना अबुल कलाम आझाद यांची जयंती राष्ट्रीय शिक्षण दिन म्हणून साजरी..

शालेयवृत्त सेवा
0

 



नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :

मौलाना अबुल कलाम आझाद यांची जयंती राष्ट्रीय शिक्षण दिन म्हणून जि.प. के.प्रा.शा निळा यडथे साजरी करण्यात आली.त्या प्रसंगी मुख्याध्यापक आणि शिक्षक शिक्षिका उपस्थित होत्या. जयंती प्रसंगी विध्यर्थ्यांशी बोलताना श्री पोहरे सर यांनी त्यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला.


11 नोव्हेंबर 1888 ते 23 फेब्रुवारी 1958 हे एक भारतीय प्रमुख राजकीय पुढारी होते. त्यांचे मूळ नाव मोहिउद्दीन अहमद असे असून अबुल कलाम म्हणजे वाचस्पती ही त्यांची पदवी होती.पुढ ‘आझाद’ (स्वतंत्र) हे टोपणनावही त्यांना ही उपाधि मिळाली.त्यांचा जन्म मक्के ला झाला. वडिलांबरोबर  1890 साली ते कलकत्याला आले.पारंपरिक मुसलमानी शिक्षणपद्धतीप्रमाणे मौ. आझादांनी फार्सी,उर्दू व अरबी या भाषांचे प्रथम अध्ययन करून नंतर तर्कशास्त्र,इस्लाम धर्म,तत्त्वज्ञान व गणित ह्यांचा अभ्यास केला.पुढे सर सय्यद अहमदखान ह्यांच्या लेखांचा परिणाम होऊन मौलानांनी इंग्रजीचा अभ्यास स्वतंत्रपणे सुरू केला.


1908 मध्ये ईजिप्त, अरबस्तान,तुर्कस्तान,फ्रान्स इ. देशांना त्यांनी भेटी दिल्या. तेथील क्रांतिकारकांच्या संपर्कामुळे त्यांची राजकीय मते बदलू लागली आणि कलकत्त्यास परत येताच हिंदी मुसलमानांनी स्वातंत्र्यसंग्रामात पुढाकार घ्यावा,हे मत त्यांनी प्रतिपादिले.लोकजागृतीसाठी 19120साली कलकत्ता येथे त्यांनी अल्-हिलाल हे उर्दू साप्ताहिक सुरू केले.अनेक वृत्तपत्रांतून ‘आझाद’ ह्या टोपणनावाने ते लेखन करीत. 


अल्-हिलालमधील प्रखर राजकीय टीकेमुळे ब्रिटिश सरकारने त्यांच्याकडून 10000 रुपयांचा जामीन मागितला. आझादांनी तो दिला नाही, म्हणून ते वृत्तपत्र बंद पडले.1915  साली त्यांनी अल्-बलाघ हे दुसरे वृत्तपत्र काढले.त्यामुळे आझादांना अनेक प्रांतांत जाण्यास बंदी घालण्यात आली; पुढे त्यांना सांचीला स्थानबद्ध करण्यात आले. मुसलमानांत त्यांच्या अटकेमुळे नवे वारे संचारले.1920 साली त्यांची सुटका झाली.ते असहकाराच्या चळवळीत सामील झाले.1921 मध्ये पुन्हा त्यांना अटक करण्यात आली; पण एका वर्षानंतर त्यांना मुक्त करण्यात आले; 1923  च्या दिल्ली येथील काँग्रेसच्या विशेष अधिवेशनाचे ते अध्यक्ष झाले. 1930  मध्ये त्यांना पुन्हा कैद झाली.ह्या वेळी मुसलमान जमातीस सत्याग्रहात सामील करून घेण्याचे मुख्य श्रेय आझादांनाच मिळाले. 


आझाद 1939 ते 46 पर्यंत काँग्रेसचे अध्यक्ष होते.1942 च्या चले जाव आंदोलनाच्या वेळी त्यांना पुन्हा तुरुंगवास भोगावा लागला. स्वातंत्र्यानंतर ते केंद्रीय मंत्रिमंडळात सामील झाले आणि अखेरपर्येत शिक्षणमंत्री म्हणून राहिले.आझाद प्रभावी वक्ते होते.त्यांचे इंग्रजी,उर्दू, अरबी व फार्सी भाषांवर चांगले प्रभुत्व होते; त्यांनी अनेक वृत्तपत्रांतून स्फुट लेखन केले आणि उर्दूत काही पुस्तके लिहिली आहेत.


त्यांतील तजकेरा,गुब्बारे खातिर्,कौले फैसल,दास्ताने करबला,तरजुमानुल कोरान ही प्रसिद्ध आहेत. तरजुमानुल कोरान म्हणजे कुराणचा सटीप उर्दू अनुवाद असून तो फार लोकप्रिय आहे. ह्याशिवाय त्यांचे इंडिया विन्स फ्रीडम 1959 हे आत्मचरित्र त्यांच्या मृत्यूनंतर प्रसिद्ध झाले आहे;  त्यांची भाषणेही पुस्तकरूपाने अलीकडे प्रसिद्ध झाली आहेत. श्रीमती रत्नपारखी मॅडम यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले तर श्रीमती पांडे मॅडम यांनी आभार प्रदर्शन केले.


टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)