शिष्यवृत्ती परीक्षेत नांदेड जिल्ह्याचा वाढता निकाल

शालेयवृत्त सेवा
0

 


शिक्षणाधिकारी डॉ. सविता बिरगे यांनी केले शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे कौतूक !


नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :

इयत्ता पाचवी व आठवी इयत्तेसाठी घेण्यात येणाऱ्या शिष्यवृत्ती परीक्षाही विद्यार्थ्यांच्या बौध्दिक कसोटीचे अचूक व खरे मापन करणारी परीक्षा असते. या परीक्षेतील यश हे विद्यार्थ्यांना पुढील भावी जीवनात अनेक स्पर्धात्मक परीक्षेतील यशाचा सुदृढ पाया म्हणून उपयोगात येते. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने ३१ जुलै रोजी घेण्यात आलेल्या पूर्व उच्च व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल ७ नोव्हेंबर रोजी घोषित करण्यात आला. या परीक्षेमध्ये नांदेड जिल्ह्याचा निकाल वाढता व प्रगती पथावर गेल्याचा दिसत आहे.


इयत्ता पाचवी १७२०१ विद्यार्थी नोंदणी झाली होती, त्यापैकी १५५८५ विद्यार्थी उपस्थित होते. अनुपस्थित विद्यार्थी १६१६ तर १३०१३ अपात्र आणि २५७३ पात्र विद्यार्थी झाले. पात्रतेची टक्केवारी १६.५ असूनही टक्केवारी गत तीन वर्षापेक्षा जास्त आहे.


इयत्ता आठवी १२६१४ विद्यार्थी नोंदणी झाली होती, त्यापैकी ११५६२ विद्यार्थी उपस्थित होते. अनुपस्थित विद्यार्थी १०५२ तर १०४१९ अपात्र आणि ११४३ पात्र विद्यार्थी झाले. पात्रतेची टक्केवारी ९.८९ असूनही टक्केवारी गत तीन वर्षापेक्षा जास्त आहे.


जिल्हा परिषद शाळेतील परीक्षेविषयी असलेली जाणीव जागृती, सराव, भरीव मार्गदर्शन यामुळे हे यश प्राप्त झाले आहे.

- डॉ. सविता बिरगे 

शिक्षणाधिकारी प्राथमिक नांदेड



टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)