वर्धा येथे राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार समन्वय सभा उत्साहात संपन्न

शालेयवृत्त सेवा
0

 



वर्धा ( किशोर नीर ) :

राष्ट्रपिता महात्मा गांधी तसेच कर्मयोगी विनोबाजी भावे यांच्या कर्मभूमीत होऊ घातलेल्या राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार समन्वय सभा विठ्ठल रुक्मिणी सभागृह कार्ला रोड वर्धा येथे संपन्न झाली .या सभेच्या अध्यक्षस्थानी  श्री बाबू मियाँ शेख सर (चंद्रपूर) हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून समाधान जाधव सर (जळगाव) राऊत सर (नागपूर) सौ वैद्य मॅडम (नागपूर) सौज्योती डाबरे मॅडम (गोंदिया) श्री गोरखनाथ वंजारी सर  (भंडारा) श्री गौतम लांडगे सर (गडचिरोली) श्री हरीश जोशी सर (यवतमाळ) श्री नगाजीसाळवे सर (चंद्रपूर) श्री श्रीराम वानखडे सर (यवतमाळ)  श्री पंढरी भाऊ तडस (वर्धा) मान्यवर होते. 


तसेच मंचावरील प्रमुख अतिथी यांनी आपल्या मनोगत यातून आपला परिचय व आपल्या जिल्ह्याची भूमिका काय आहे तसेच आपल्या जिल्ह्यात कर्तव्य भावनेने करीत असलेले प्रयत्न विशद केले तसेच वेतन वाढ मिळण्यासाठी कशा व कोणत्या मार्गाचा अवलंब करता येईल याबाबत मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक वर्धा जिल्हा समन्वयक श्री राजेंद्रजी भोयर सर यांनी केले .त्यांनी आपल्या प्रास्ताविकेत ही संघटना कशासाठी तयार केली आहे याबाबतीत माहिती विशद केली.


आपल्या अध्यक्षीय भाषणात श्री बाबू शेख सर यांनी मार्गदर्शन करतांना म्हणाले की, 2018 च्या शिक्षक दिनाच्या एक दिवस अगोदर वेतन वाढ बंद करण्याचा निर्णय घेऊन शिक्षकी व्यवसायाची थट्टाच केली नाही तर एकंदरीत शिक्षकांच्या सामाजिक व शैक्षणिक नवनिर्माणतेला व सृजनशीलतेला खीळ घालण्याचे काम केलेले आहे. दर्जेदार शिक्षणातून प्रगतिशील राज्य घडविण्यासाठी अशा प्रकारची वेतनवाढ किती आवश्यक आहे आणि ती मिळविण्यासाठी नियोजनबध्द त्रिसुत्री कृतियोजना त्यांनी विषद केली व त्याच्या अमलबजावणीसाठी सर्वांनी एकत्र येऊन संघटित लढा उभारण्याची आवश्यकता असल्याचे विशद केले.या प्रथम सत्रातील कार्यक्रमाचे उत्कृष्ट संचा लन श्री गजानन बर्वे सर ,वर्धा यांनी केले तर आभारप्रदर्शन श्री संजय रॉय सर वर्धा यांनी व्यक्त केले. यानंतर उपस्थित असणाऱ्या सर्व शिक्षक बांधवांच्या ग्रूप फोटो काढल्यानंतर प्रथम सत्राची सांगता झाली.


श्री किशोर बबनराव निर सर,चंद्रपूर व श्री शेख सर वर्धा यांनी  निवेदनाचा मसुदा तयार केला.व त्याची प्रिंट काढून त्यावर उपस्थिती सदस्यांची स्वाक्षरी घेण्यात आली. सकाळी 10 ते 10.30  वाजेपर्यंत नास्ता व दुपारी 1 ते 2.00 वाजे दरम्यान स्वादिष्ट भोजनाची व्यवस्था झाली. अशाप्रकारे प्रथम सत्राची इथे सांगता झाली.

  

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)