महत्वाचे पत्र : जिल्हांतर्गत बदल्यांबाबत

शालेयवृत्त सेवा
0

 



जिल्हा परिषदेतील शिक्षक संवर्गाच्या सन २०२२ मधील जिल्हांतर्गत बदल्यांबाबत..

क्र.जिपब-४८२०/प्र.क्र.२९०/आस्था-१४, वि.०७.०४.२०२१. शासनाचे समक्रमांकाचे दि.२१/१०/२०२२ रोजीचे पत्र.


शासन निर्णय जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांसाठी संदर्भीय दि.०७.०४.२०२१ च्या शासन निर्णयान्वये सुधारित धोरण विहित करण्यात आले आहे. सदर धोरणातील तरतूदीनुसार आवश्यक ती कार्यवाही करण्याबाबत (बदलीस पात्र असलेल्या / विशेष संवर्ग भाग-१ मधील / विशेष संवर्ग भाग-२ मधील शिक्षकांची यादी, निव्वळ रिक्त पदांची यादी, संभाव्य रिक्त पदांची यादी, जिल्ह्यातील अवघड क्षेत्र घोषित करणे, इत्यादी) वेळोवेळी आपणास शासन स्तरावरुन निर्देश देण्यात आलेले आहेत.


संदर्भीय दि.२१/१०/२०२२ च्या पत्रान्वये जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांबाबतचे सुधारित वेळापत्रक निश्चित करण्यात आले असून त्यानुसार बदल्यांची कार्यवाही सुरु आहे. तथापि, काही जिल्हा परिषदांमध्ये एकच UDISE क्रमांक असलेल्या काही शाळा विविध माध्यमांच्या असून अशा शाळांतील शिक्षकांचा / रिक्त पदांचा तपशील भरण्यास अडचण येत असल्याची बाब शासनाच्या निदर्शनास आली आहे. त्यामुळे अशा शाळांतील शिक्षकांची/ रिक्त पदांची माहिती माध्यमनिहाय भरण्याबाबतची सुविधा ऑनलाईन शिक्षक बदली प्रणालीमध्ये उपलब्ध करुन देण्यात येत असून अशा शाळांतील शिक्षकांची / रिक्त पदांची माहिती ऑनलाईन शिक्षक बदली प्रणालीमध्ये माध्यमनिहाय अद्ययावत करावी. जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांसाठी आगोदरच विलंब झालेला असल्याचे अशा प्रकरणी कार्यवाही करण्यास विलंब कटाक्षाने टाळावा.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)