आशयज्ञान व अध्यापन पद्धती यावर आधारित प्रशिक्षण विषयक गरजा निश्चित करण्यात येणार

शालेयवृत्त सेवा
0



प्राथमिक व माध्यमिक शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षक यांचेसाठी आशयज्ञान व अध्यापन पद्धती यावर आधारित प्रशिक्षण विषयक गरजा निश्चित करण्यात येणार आहेत. यासाठी माहिती संकलन साधनाद्वारे माहिती संकलित करण्यात येणार आहे. या प्राप्त झालेल्या माहितीच्या आधारे प्रशिक्षण विषयक गरजा निश्चित करून मुख्याध्यापक व शिक्षक यांच्यासाठी प्रशिक्षण निर्मिती केली जाणार आहे.


सदर प्रशिक्षण विषयक गरजा निश्चित करण्याच्या प्रक्रियेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या प्राथमिक व माध्यमिक शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षक यांची माहिती मागविण्यात येत आहे. तरी आपल्या अधिनस्त जास्तीत जास्त मुख्याध्यापक व शिक्षक यांना

 https://tinyurl.com/teacherassessmentinfo 

या लिंकवर अथवा सोबत दिलेल्या QR Code द्वारे दि.१० नोव्हेंबर ते २५ नोव्हेंबर २०२२ या कालावधीत माहिती भरण्यासाठी आदेशित करण्यात यावे.



श्री राजेंद्र वाकडे,

वरिष्ठ अधिव्याख्याता तथा उपविभाग प्रमुख, 

संशोधन विभाग, 

राज्य शैक्षणिक संशोधन व 

प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र 

७०८, सदाशिव पेठ, कुमठेकर मार्ग, पुणे ४११०३०

दुरध्वनी क्र. (०२०) २४४७६९३८, २४४७५५७१

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)