राज्य शिक्षक पुरस्काराचे वितरण महात्मा फुले स्मृतीदिनी २८ नोव्हेंबरला करण्यात यावे

शालेयवृत्त सेवा
0



इंडियन बहुजन टिचर्स असोशिएशनची मुख्यमंत्र्याकडे मागणी


नांदेड ( प्रतिनिधी ) :

महाराष्ट्र शासनाच्या वतीने दिले जाणारा "क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्यशिक्षक गुणगौरव पुरस्काराचे" वितरण म. जोतीराव  फुले यांच्या स्मृतीदिनी २८ नोव्हेंबरला करण्यात यावे अशा आशयाचे निवेदन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांना इंडियन बहुजन टिचर्स असोशिएशन ' इब्टा ' या शिक्षक संघटनेच्या वतीने नुकतेच देण्यात आले.

 

पुरोगामी महाराष्ट्रातील आपल्या सरकारने "क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्यशिक्षक गुणगौरव पुरस्कार " असे नामाभिधान करून सावित्रीमाईच्या कार्याचा  गौरवच केला आहात. त्याबद्दल सर्वप्रथम आपले मन:पूर्वक अभिनंदन ! त्या अनुषंगाने त्या नावाला शोभेल असा पुरस्कार वितरण सोहळा मुलिंसाठी पाहिली शाळा काढणारे कृतीशील समाजसुधारक जोतीराव फुले यांच्या स्मृतीदिनी म्हणजे २८ नोव्हेंबरला दरवर्षी प्रदान करण्यात यावा असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. 


शिक्षण हा समाजाचा सर्वांगीण विकासाचा पाया आहे समर्पित वृत्तीने काम करणाऱ्या शिक्षकांमुळेच समाज व राष्ट्राचा विकास होतो. अशा समर्पित व निष्ठापूर्वक काम करणाऱ्या शिक्षकांना दरवर्षी शालेय शिक्षण व क्रीडा विभागातर्फे राज्य आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरविले जाते. 


थोर समाजसुधारक  सावित्रीमाईंनी ज्ञानाची ज्योत लावून खऱ्या अर्थाने शिक्षणाची सुरुवात केली. पहिली महिला शिक्षिकेच्या नावाने पुरस्कार स्वीकारताना आमचा ऊर भरून येणार यात शंका नाही. म्हणून पुरोगामी महाराष्ट्रातील आपल्या सरकारने हाच पुरस्कार सोहळा २८ नोव्हेंबरला आयोजित करून खऱ्या अर्थाने जोतीराव आणि सावित्रीमाईचे विचार सर्वापर्यंत पोहोचवावा अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. 


कोरोनामुळे दोन वर्षापासून प्रलंबित असलेल्या पुरस्काराचे वितरणही लवकरच करण्याची विनंतीही निवेदनात केली आहे. मेलव्दारे पाठवलेल्या निवेदनावर नांदेडचे केंद्रीय जिल्हाध्यक्ष बालासाहेब लोणे, जिल्हा कार्याध्यक्ष उत्तम कानिंदे, विजयकुमार गजभारे, राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक तथा  जिल्हा सरचिटणीस रमेश मुनेश्वर, निलेश गोधने, शेख अहेमद, नागनाथ येरमलवाड,  यांच्यासह इंडियन बहुजन टिचर्स असोशिएशन ' इब्टा ' पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.



टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)