आदर्श शिक्षकांच्या निवडीसाठी झाल्या मुलाखती पण अजूनही घोषणा नाही !

शालेयवृत्त सेवा
0

 



हिंगोली (शालेय वृत्तसेवा) : 

राज्यातील आदर्श शिक्षक निवडण्यासाठी यंदा दोन वर्षानंतर मुहूर्त लागला. शासनाने शिक्षकाकडून नामांकन मागवले मुलाखती झाल्या. पुरस्कारासाठी १.९५ कोटीच्या निधीची तरतूदही करण्यात आली. आता नावे जाहीर होऊन शिक्षक दिनी पुरस्कार हातात पडेल असे शिक्षकांना आशा होती. मात्र चार महिन्यानंतरही ते झाले नाही. राज्यात उत्कृष्ट काम करणाऱ्या १०९ गुरुजींना क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राज्यस्तरीय गुण गौरव पुरस्कार दिला जातो. शिक्षकाकडून प्रस्ताव मागवून मुलाखती घेतल्या जातात. विजेत्यांना पाच सप्टेंबरला पुरस्काराचे वितरण केले जाते. दोन वर्षाच्या खंडानंतर यंदा प्रक्रिया राबवली तरी पुरस्काराची घोषणा अद्याप झालेली नाही.



चार महिने उलटून गेले यंदा २०२१ - २२ साठी प्रक्रिया राबविण्यात आली २८ जुलै ते ७ ऑगस्ट दरम्यान ऑनलाईन प्रस्ताव मागवले. १२ ऑगस्ट ते १६ ऑगस्ट दरम्यान आधी जिल्हास्तरावर व नंतर राज्यस्तरावर मुलाखती घेतल्या गेल्या. गुणांकन प्राप्त गुरुजींची माहिती शासनाला कळविण्यात आली. पुरस्कार प्राप्त शिक्षकांना प्रत्येकी एक लाख रुपये रोख पुरस्काराचे स्वरूप आहे. त्यासाठी २६ आगस्ट रोजी शासन निर्णयाद्वारे १.९५ कोटी रुपयाची तरतूदही करण्यात आली.



एकूण ४६५ शिक्षकांच्या झाल्या मुलाखती 

पुरस्कारासाठी प्राथमिक शिक्षक गटातून ३८ माध्यमिक शिक्षकातून ३९ आदिवासी क्षेत्रातील शिक्षकातून १९ सावित्रीबाई फुले शिक्षिका पुरस्कारासाठी ८ आणि विशेष शिक्षक क्रीडाशिक्षक कला दिव्यांग स्काऊट गाईड गटातून प्रत्येकी एक शिक्षकांची अशा १०९ शिक्षकाची निवड केली जाते. त्यासाठी ४६५ शिक्षकांच्या मुलाखती घेण्यात आल्या होत्या.



अद्याप घोषणा नाहीच 

प्रक्रिया राबवून चार महिने उलटले तरी शासनाकडून पुरस्कार प्राप्त गुरुजींच्या नावाची घोषणा करण्यात आलेली नाही. यामुळे मुलाखती दिलेल्या गुरुजींचे डोळे पुरस्काराच्या घोषणाकडे लागले आहेत. त्याबाबतच्या हालचाली न दिसल्याने शिक्षकांमध्ये नाराजीचा सूर आहे. आमच्या पाठीवर कौतुकाची थाप कधी पडणार असा सवाल शिक्षकात आहे.




"दोन वर्षाच्या खंडानंतर या वर्षी आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी मुहूर्त लागला. याची प्रक्रिया पूर्ण झाली पण अजून विजेत्यांच्या नावाची घोषणाही झाली नाही. यासाठी नुकतेच शिक्षण आयुक्तांना निवेदन दिले आहे. शासनाने लवकरात लवकर पुरस्कार देऊन गुरुजींच्या पाठीवर कौतुकाची थाप द्यावी.

- सुभाष जिरवणकर 

राज्याध्यक्ष

राज्य व राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्राप्त संघ

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)