शिक्षणाधिकारी डॉ सविता बिरगे व डाएट प्राचार्या जयश्री आठवले रमल्या वीटभट्टीमजूरांच्या मुलांसोबत

शालेयवृत्त सेवा
0

  



वीटभट्टी कामगारांच्या मुलांसाठीची शाळाबाहेरची शाळा 

उपक्रमशील शिक्षिका उषा नळगीरे यांच्या कामाचे मान्यवरांने केले कौतूक !


नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :

शाळेबाहेरची शाळा - माझी प्रयोगशाळेचा औपचारिक शुभारंभ सोहळा संपन्न झाला. पोटाची खळगी भरण्यासाठी गावापासून दूर स्थलांतरित कुंटूबातील मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी व गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी  अभय परिहार व उषा नळगिरे यांच्या संकल्पनेतून बदलाव हम लाऐंगे ग्रुपने दररोज सायंकाळी 4ते 5.30 या वेळेत  शाळेबाहेरची शाळा माझी प्रयोगशाळा सुरू केली आहे.


या शाळेत प्रामुख्याने वीटभट्टीमजूरांची स्थलांतरित कुंटूबातील मुले आहेत.ते नियमित नजीकच्या शाळेत जातात व शाळा सुटल्यानंतर या शाळेत आपल्या कलागुणांना प्रोत्साहित करण्यासाठी सहभागी होतात.या शाळेच्या औपचारिक उद्घाटन प्रसंगी  मा. डॉ. सविता बिरगे, शिक्षणाधिकारी, प्राथमिक नांदेड, मा. जयश्री आठवले प्राचार्या डाएट नांदेड मा. श्री. बाळगीर पंचमगीर गिर (रावसाहेब महाराज)माजी जिल्हा परिषद या मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. 


शुभारंभ प्रसंगी डायट, नांदेड संस्थेचे श्री. श्रीकिशन देशमुख, ज्येष्ठ अधिव्याख्याता, श्री.चंद्रकांत धुमाळे, अधिव्याख्याता, श्री. शिवाजी साखरे, अधिव्याख्याता, डॉ. दादाराव शिरसाट, जिल्हा बालरक्षक समन्वयक, बालरक्षक शिक्षिका श्रीमती उषा नळगिरे, श्री. बालाजी कानीखेडकर, तंत्रस्नेही फिरते विशेष शिक्षक, किनवट, कु. सोनी टीचर, श्री मारुती ढगे, विषय साधन व्यक्ती, नांदेड,प्रथम संस्थेचे जिल्हाप्रमुख मसूहूद्दीन व सदस्य उपस्थित होते. 


आज विद्यार्थ्यांनी कागदापासून झाड तयार करण्याचे कलाकृती आत्मसात करून त्याद्वारेच मान्यवर पाहुण्यांचे स्वागत केले.विद्यार्थ्यांनी उपस्थित मान्यवरांना शाळेची कार्यपद्धती, वाचन वृक्ष, समाजशास्त्र (माझ्यापासून ते जगापर्यंत ), शास्त्र व आरोग्य, खेळणी आधारित शिक्षण, शारीरिक विकास व गणित, स्वच्छता, सेल्फी पॉईंट, ध्यान करण्याचे ठिकाण, मी आज कोणाला कोणती मदत केली ? आणि आज मी काय शिकलो ? इत्यादी बाबींचे सादरीकरण केले. आजच्या प्रसंगी मा. प्राचार्य, डायट, नांदेड आणि मा. डॉ. सविता बिरगे शिक्षणाधिकारी प्राथमिक,नांदेड यांनी चर्चेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांशी संवाद साधताना रात्रीचे सात वाजले तरीही या शाळेतील मुलांसोबत मुक्त संवाद साधत प्रत्येक मुलांनी शिकून आपल्या ध्येयाला गवसणी घालावी असे मत व्यक्त केले. 


स्थलांतरित कुंटूबातील मुलांच्या शिक्षणासाठी करत असलेले काम नक्कीच प्रेरणादायी आहे असे समारोप प्रसंगी शिक्षणाधिकारी डॉ सविता बिरगे मॅडम यांनी मत व्यक्त केले आणि डाएट अधिव्याख्याता अभय परिहार व ध्येयवेड्या बालरक्षक शिक्षिका उषा नळगिरे यांच्या कार्याचे कौतुक करून बिएचएल ग्रुपच्या सर्व सदस्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)