संविधानाच्या तत्वांचा जीवनात अंगीकार करावा - आर.जे. दिग्रसकर

शालेयवृत्त सेवा
0

 




नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :

भारतीय संविधान दिनाच्या औचित्याने भारतीय संविधानाविषयी जाणीव जागृती व्हावी, आणि भारतीय संविधानातील मुलभूत तत्त्वांचा विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनात अंगीकार करून त्या आधारे संविधानाचा योग्य सन्मान करावा असे कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे सचिव श्री. आर जे दिग्रसकर साहेब यांनी सांगितले.


तसेच प्रमुख पाहुणे जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्री. शंकरराव बाभळीकर यांनी देखील संविधानाची पार्श्वभूमी विद्यार्थ्याना आपल्या विचारातून सांगितली. प्रारंभी कार्यक्रमा अध्यक्ष आणि प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचे आणि संविधानाचे पूजन करण्यात आले. या निमित्ताने शाळेचे मुख्याध्यापक श्री सचिन दिग्रसकर यांनी प्रास्ताविक केले तसेच  शिक्षिका सौ. संध्या सिंदगीकर, सौ. सीमा दिग्रसकर आणि श्री. नामवाड सर यांनी आपले विचार व्यक्त केले.


शाळेतील विद्यार्थीनी कु. स्वाती अंगिरगे  हिने सुत्रसंचलन केले आणि आधार प्रदर्शन कु. जान्हवी मस्के त्यांनी केले. व कु. गुंजन दिग्रसकर दिने संविधानाचे वाचन केले. या निमित्ताने शाळेतील विद्यार्थ्याचे  भाषणे घेण्यात आले. यावेळी सर्व शिक्षक व शिक्षिका परिसरातील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)