अष्ठपैलू व्यक्तीमत्व तथा उपक्रमशील शिक्षक सदाशिव गच्चे यांची सेवापूर्ती

शालेयवृत्त सेवा
0



तथागत गौतमबुध्द, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर व सर्व पुरोगामी व परिवर्तनवादी महापुरुषांच्या विचारावर निष्ठा  देवून कृती करणारे,शून्यातून विश्व निर्माण करणारे सामाजिक कार्यकर्ते, प्रत्पक्ष लोककवी वामनदादा कर्डक यांनी तोंडभरून कौतुक केलेले महाराष्ट्रातील ज्येष्ठ संगितकार, गायक,लेखक व लॉर्ड बुद्धा टीवीचे नांदेड जिल्हा प्रतिनिधी मा.सदाशिव गच्चे, बामणीकर आज निहीत वयोमानानुसार नरसिंह विद्यामंदीर येथील संगित शिक्षक पदावरून सेवानिवृत्त होत आहेत. त्यांच्या सेवापूर्ती निमित्त व भावी सामाजिक कार्यासाठी खूप खूप मंगल कामना.

    

मा.सदाशिव गच्चे, बामणीकर यांचा कौटुंबिक व सांगितिक प्रवास अतिशय खडतर असाच होता. मोळी विका पण मुलांना शिकवा व शहराकडे चला या बाबांसाहेबांचा उपदेश तंतोतत पालन करण्यासाठी मा.रोहीदास गच्चे व मा.सौ.रुख्मिणबाई गच्चे यांनी  बामणी ता.लोहा हे गाव सोडून नांदेड शहराची वाट धरली. मा.सदाशिव गच्चे व भावंडानी खडतर प्रवास करत आपापल्या क्षेत्रात एक यशस्वी जीवन व्यतित करीत आहेत. मा.सदाशिव गच्चे यांना लहानपणांपासुनच संगित, लहानमोठयांशी संवाद साधने, व्यक्तिंच्या बारिक सारिक लकबींच्या निरिक्षण करणे आदी क्षमतेची व तल्लख विनोदी बुध्दीची देण आहे. त्यामुळे त्यांनी संपूर्ण आयुष्यभर अनेक सुखदुःख लिलया पेललेत.

      

लालवाडी,नांदेड येथील नांदेड टेक्सटाईल मिलच्या कामगाराच्या वस्तीतच त्यांचा सांगित्यिक प्रवास अगदी बालपणीपासुनच सर्वोत्तम बालगायक म्हणून सुरु झाला. पुढे महाराष्ट्रातील अनेक खेडोपाडो व शहरातील गलोगलीत हा सदाशिव गच्चे नावाचा बालगायक अनेक बुध्दभिम गितांचे सांगित्यिक कार्यक्रमांचे मुख्य आर्कषण ठरले. संगिताच्या आपल्या आवडीला व्यावसायिक शिक्षणाची जोड असावी यासाठी मा.सदाशिव गच्चे यांनी यशवंत महाविद्यालय नांदेड येथून संगित विभागप्रमुख सूरमणी पंडीत श्याम गुंजकर सर यांच्या मार्गदर्शनाखाली संगित विषयात पदवीव्युत्तर  बी.ए.(संगित) विषयाचे अध्ययन पूर्ण केले. नरसिंह विद्या मंदीरच्या प्राचार्या मा.सरोज जाधव व संस्थाध्यक्ष मा.नागोराव जाधव यांनी आपल्या शाळेच्या या माजी विद्यार्थ्याला शाळेत बोलावून घेवून गुणवत्तेवर विनासायास संगीत शिक्षकाची नोकरी दिली. संस्थेत रुजू करून घेतले. येथून सदाशिव गच्चे यांच्या खऱ्या अर्थाने सांगित्यिक प्रवास सुरुवात झाला.

      

त्यांनी आकाशवाणीचे ए ग्रेड आर्टीस्ट म्हणून नामांकित झाले. हजारो विद्यार्थ्यांत संगितची आवड निर्माण करणारे संगितशिक्षक झाले. त्यांनी आपल्या शाळेतील संगित संच व मुले जिल्हा,राज्य व राष्ट्रीय पातळीपर्यंत अनेक पुरस्कार पटकावत यशस्वी केली. शाळेचे, जिल्हाचे नाव रोषण केले. दखल प्रतिष्ठानची स्थापना करून अनेक    बेदखल गायक,कलावंत, सामाजिक कार्यकर्ते यांची मदत केली. बुध्दपहाट सारख्या कार्यकमाची नांदेडमध्ये सुरुवात केली. त्यांना आजपर्यंत जिल्हा, राज्य, राष्ट्रीय स्तरावरील शासकीय, निमशासकीय व खाजगी संस्थाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे.

       

संगिताची आवड व उर्मी त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. त्याकाळी नांदेडमध्ये कोणत्याही सुविधा नसल्यामुळे तत्कालीन आकाशवाणी अधिकारी मा.अमर रामटेके यांच्या सहाय्याने थेट मुंबई गाठून महासूर्य, इतिहासाच्या पानावर, बाबा तू आमुचा दाता, परमपूज्य बाबासाहेब या महाराष्ट्राला वेड लावणारे भिमबुध्द गिते व सुप्रसिद्ध "सांज आहे सोबतीला" या भावगीतांचे प्रिझम, फाऊंटन कॅसेट व अन्य प्रतिष्ठीत कॅसेट कंपन्या मार्फत अनेक ध्वनीफिती  काढल्या व महाराष्ट्रभर गाजल्या एवढेच नव्हे तर दस्तूरखूद्द लोककवि वामनदादा कर्डक यांनी त्यांच्या सांगितिक कार्याचे  तोंडभरून कौतुक केले. महाराष्ट्रातील प्रथितयश गायक प्रल्हाद शिंदे, महेंद्र कपूर, सुरेश वाडकर, कृष्णा शिंदे,अरुण इंगळे, जितेंद्र अभ्यंकर,सुधीर वाघमोडे, कविता कृष्णमुर्ती, उत्तरा केळकर, शंकुतला जाधव, एल. पद्मजा ते सामान्य  गायक गायिकांकडून सर्वोत्तम गित गायन करुन घेणारे यशस्वी संगितकार  आहेत. त्यांनी अनेक वर्ष आपल्या संगित संचामार्फत महाराष्ट्राचे दौरे करून राज्यभर गित गायनाचे कार्यक्रम केले. नोकरी व दौरे करणे ही तारेवरची कसरत होत असल्यामुळे त्यांनी संगित संचाचे दौरे मर्यादीत केले.

    

पुढे मा.भैय्याजी खैरकर व मा.सचिन मून यांनी लॉर्ड बुद्धा टीवी चॅनल सुरू केल्यानंतर मा.सदाशिव गच्चे यांच्याकडे दिलेली जिल्हा प्रतिनिधीची जबाबदारी अतिशय निष्ठेने व प्रामाणिकपणे पेलली. त्यात  कलावंतांसाठी "चमकते सितारे, मिले गांव में हमारे", "खास बात" या सदराखाली अनेक सामाजिक कार्यकर्ते, कलावंत, गायक मान्यवरांच्या मुलाखती तसेच वंचित घटकांतील सामान्य कार्यकर्त्यांची दखल घेत लोकांसमोर आणले आणि हे काम तहहयातपणे चालू राहणार आहे.

      

मा.सदाशिव गच्चे यांच्या सेवापूर्ती निमित्त दीर्घ निरोगी, निरामय आयुष्य व सामाजिक कार्यासाठी खूप खूप मंगल कामना. !

- बालासाहेब लोणे, नांदेड

9421756489 (Wts) / 8975401662

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)