पेठच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये संविधान दिन उत्साहात साजरा..

शालेयवृत्त सेवा
0

 


              

शालेय वृत्तसेवा :      

कासेगांव एज्युकेशन सोसायटीच्या न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज,पेठ येथे संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला.भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. विद्यार्थी व शिक्षक यांनी संविधानाचे सामुहिक वाचन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक एन.डी.पाटील यांनी केले. 


संविधान दिनानिमित्त विद्यालयात चित्रकला स्पर्धा व निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या. चित्रकला स्पर्धेत विद्यार्थ्यांना 5 वी ते 7 वी गटासाठी संविधान दिन प्रभात फेरी,भारतीय संविधान म्हणताना विद्यार्थी, भारताची राजमुद्रा,भारतीय संविधान दिन हे विषय तर 8 वी ते 10 वी गटासाठी माझे  संविधान, माझा अभिमान,डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे चित्र, भारतीय संविधान दिन हे विषय देण्यात आले. 


विद्यार्थ्यांनी दिलेल्या विषयावर कल्पकतेने सुंदर चित्रे रेखाटली.विद्यार्थ्यांनी रेखाटलेल्या चित्रांचे शिक्षणाधिकारी मोहनराव गायकवाड, सचिव आर.डी.सावंत,अधीक्षक ए.डी. पाटील, उपअधीक्षक एस्.एल्. माने, पर्यवेक्षक एस्.एम्.पवार, मुख्याध्यापक एस्.बी.माने सर्व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी यांनी कौतुक केले. चित्रकला स्पर्धेचे संयोजन मुख्याध्यापक एस्.बी. माने,सर्व शिक्षक, कलाशिक्षक अरविंद कोळी यांनी केले.

   

यावेळी मुख्याध्यापक एस्.बी.माने, कार्याध्यक्ष एन्.डी.पाटील,उपकार्याध्यक्षा एस्.आर.बनसोडे, ज्येष्ठ शिक्षक जे.आर.कदम, आर.पी.पवार, ए.पी. ढवळीकर, पी.टी.पाटील, बी.डी.जाधव, एम्.व्ही. भोपळे ,व्ही.आर.माळी,  एस्.वाय.सावंत, व्ही.बी.बंडगर, एस्.एस्.कोठावळे,एन्.पी.नलवडे, माधुरी आडके सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, सर्व विद्यार्थी,विद्यार्थिनी उपस्थित होते.



टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)