पदवीसाठी लागणार चार वर्षे

शालेयवृत्त सेवा
0

 
पुढील शैक्षणिक वर्षापासून बीए, बीकॉम आणि बीएससीसाठी जे विद्यार्थी प्रवेश घेणार आहेत त्यांना पदवी  मिळविण्यासाठी चार वर्षांचा कालावधी लागणार आहे. युजीसीने यासाठी चार वर्षांचा ग्रॅज्युएशन प्रोग्रॅमचा फ्रेमवर्क निश्चित केले आहे. केंद्रीय विश्वविद्यालयासह राज्य स्तरावरील आणि खासगी विश्वविद्यालयेदेखील चार वर्षांचा अंडरग्रॅज्युएट कोर्स लागू करणार आहेत. देशीतील अनेक डीम्ड टू बी विद्यापीठेदेखील हा अभ्यासक्रम स्वीकारण्यास तयार झाले आहेत.
विद्यार्थ्यांकडे तीन वर्षांत डिग्री मिळविण्याचा पर्यायही खुला असणार आहे. हा पर्याय फक्त या शैक्षणिक वर्षात ज्या विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे त्यांच्यासाठी लागू असणार आहे.
चार वर्षांच्या अभ्यासक्रमासाठी विद्यापीठे त्यांच्या स्तरावर काही नियमही बनवू शकतील . ज्या विद्यार्थ्यांनी ग्रॅज्युएशन प्रोग्रॅम पूर्ण केला आहे, त्यांना पीजी किंवा एमफिलसाठी प्रवेश घ्यायचा असल्यास ५५ टक्के गुण असणे आवश्यक  असणार आहे. तसेच एमफिलसाठी विद्यार्थी खूप काळ घेऊ शकणार नाहीत.  देशातील सर्व शैक्षणिक संस्थांमध्ये १२ वी नंतरच्या डिग्रीसाठी म्हणजेच ग्रॅज्युएशनसाठी चार वर्षे लागणार आहेत.याबाबतचा महत्वाचा निर्णय विश्वविद्यालय अनुदान आयोगाने (युजीसी) घेतला आहे. पुढील आठवड्यापासून याबाबतची माहिती सर्व विद्यापीठांना पाठविली जाणार आहे. यामध्ये ४५ केंद्रीय विद्यापीठांचा देखील समावेश आहे. ही माहिती युजीसीच्या अध्यक्षांनी दिली.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)