राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र-पुणे आयोजित राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेचे आयोजन | SCERT

शालेयवृत्त सेवा
0

 



राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा सन २०२२-२३ 

२० नोव्हेंबर पर्यंत नवोपक्रम सादर करण्याचे आवाहन !


राज्यातील सर्व नवोपक्रमशील शिक्षक व अधिकारी हे विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी सतत प्रयत्न करत असतात. नवोपक्रमाच्या माध्यमातून आपल्या कल्पनांना व सृजनशील विचारांना मूर्त स्वरूप देण्याकरिता तसेच विद्यार्थी, शिक्षक, पालक यांच्या समस्या सोडविण्याच्या अनुषंगाने नवनवीन उपक्रम हाती घेत असतात. सर्वच स्तरातील शिक्षक व अधिकारी यांच्या या कल्पकतेला व सृजनशीलतेला प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी परिषदेमार्फत राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा आयोजित करण्यात येते.


त्यानुसार या वर्षीही राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा सन २०२२-२३ चे पुढील पाच गटात आयोजन करण्यात येत आहे.


१.पूर्व प्राथमिक स्तरावरील अंगणवाडी कार्यकर्त्या/सेविका व पर्यवेक्षिका

२. प्राथमिक शिक्षक व मुख्याध्यापक

३. माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षक व मुख्याध्यापक

४. विषय सहाय्यक व विषय साधन व्यक्ती विषय सहायक, विषय साधन व्यक्ती, समावेशित साधन व्यक्ती व ग्रंथपाल गट

५. अध्यापकाचार्य व पर्यवेक्षकीय अधिकारी (केंद्रप्रमुख ते शिक्षणाधिकारी व अधिव्याख्याता व वरिष्ठ अधिव्याख्याता)



तसेच ही स्पर्धा पहिल्या टप्प्यात गट १ व ३ यासाठी जिल्हा / DIET व गट क्र. ४ व ५ साठी प्रादेशिक विद्या प्राधिकरण (RAA) स्तरावर घेण्यात येणार आहे. या स्पर्धेत जास्तीत जास्त नवोपक्रमशील शिक्षक, शिक्षक प्रशिक्षक व अधिकाऱ्यांना सहभाग घेण्यासाठी whats App, वर्तमानपत्र यासारख्या प्रसार माध्यमांच्याद्वारे प्रसिद्धी देण्यात यावी. यासाठी प्राचार्य, DIET व संबंधित जिल्ह्यातील शिक्षणाधिकारी (प्राथमिक व माध्यमिक), उपमुख्य कार्यकारी अधिकारी, महिला व बालविकास विभाग, जिल्हा परिषद यांनी एकमेकांशी समन्वय साधावा. आपल्या स्तरावरून देखील सोबत दिलेल्या माहितीपत्रकाचे वाचन करून राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेविषयी आपल्या कार्यालयातील सर्व अधिका-यांना याबाबत अवगत करावे. 


या स्पर्धेची जबाबदारी एका सक्षम अधिका-याकडे देण्यात येऊन नवोपक्रम स्पर्धेची माहिती पोहचविण्यासाठी केलेल्या कार्यवाहीचा अहवाल या कार्यालयास researchdept@maa.ac.in या ई- मेल द्वारे कळविण्यात यावा. त्यानुसार आपल्या अधिनस्त अधिकारी, शिक्षक, अंगणवाडी सेविका व पर्यवेक्षिका यांना

https://scertmaha.ac.in/innovation/ 


या लिंकवर दि.०२/११/२०२२ ते दि.२०/११/२०२२ या कालावधीत आपले नवोपक्रम अहवाल सादर करण्याविषयी सूचित करण्यात यावे.


संपूर्ण जगभर उद्भवलेल्या कोविड-१९ या महामारीच्या काळातही सर्व मुलांचे शिक्षण सुरु राहावे यासाठी सर्वत्र प्रयत्न होत आहेत. याचबरोबर राज्यातील नवोपक्रमशील शिक्षक व अधिकारी विद्यार्थ्यांच्या अध्ययनात खंड पडू नये यासाठी नवनवीन उपक्रम तसेच कल्पनांचा वापर करत आहेत. तसेच प्रत्येक मूल प्रगत होण्यासाठी शिक्षक व अधिकारी प्रयत्न करीत आहेत. त्यांनी राबविलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमाची माहिती राज्यातील शिक्षण क्षेत्रातील सर्व घटकांना व्हावी तसेच सर्वच स्तरातील शिक्षक व अधिकारी यांच्या नवोपक्रमशीलतेला व सृजनशीलतेला प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे मार्फत सन २०२२-२३ या वर्षासाठी राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा पुढील पाच गटात आयोजित करण्यात येत आहे.


ही स्पर्धा ऑनलाइन पद्धतीने आयोजित करण्यात येत आहे. सृजनात्मक कार्याची आवड असणाऱ्या नवोपक्रमशील शिक्षक व अधिकाऱ्यांनी या स्पर्धेत भाग घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)