राज्यातील शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या शिष्टमंडळाने घेतली ग्रामविकास मंत्री महोदय यांची भेट... मुख्यालयी राहण्याची अट रद्द करण्याची मागणी

शालेयवृत्त सेवा
0


नांदेड ( एस.एस.पाटील ) :

महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री नामदार मान श्री गिरीशजी महाजन साहेब व नांदेड जिल्ह्याचे खासदार मान श्री प्रताप पाटील चिखलीकर साहेब नांदेड जिल्हा दौऱ्यावर असताना महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभागाचे राज्य कार्यवाह श्री मधुकर उन्हाळे यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या शिष्टमंडळाने माननीय मंत्री महोदयांची भेट घेतली व शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्नावर निवेदन देऊन चर्चा केली असता मांननिय मंत्री महोदयांनी शिक्षकांचे सर्व प्रश्न लवकरात लवकर सोडवले जातील असे आश्वासन दिले आहे.


यावेळी राज्यातील शिक्षकांच्या पुढील प्रश्नावर चर्चा करण्यात आली.


1)जि प अंतर्गत कार्यरत असणाऱ्या प्राथमिक, माध्यमिक शिक्षकांना दरवर्षी निवड श्रेणी ,वरिष्ठ वेतन श्रेणी,व   पदोन्नती प्रक्रिया शासन स्तरावरून वेळेवर राबवण्याचे आदेश दिलेले असताना सुद्धा राज्यातील बहुतांश जिल्हा परिषद मध्ये वरिष्ठ वेतनश्रेणीचे व निवड श्रेणीचे प्रस्ताव, पदोन्नतीची प्रक्रिया नियमितपणे राबवली जात नाही ही प्रक्रिया नियमित व वेळेत राबवावी व दरवर्षी पदोन्नतीचे आदेश निर्गमित करण्यात यावेत याबाबत मागणी करण्यात आली.

2) तसेच राज्यातील बहुसंख्य रिक्त असलेली पर्यवेक्षीय यंत्रणेपैकी शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख पदे प्राथमिक शिक्षकांमधून पदोन्नत्ती ने तात्काळ भरण्यात यावीत.

3)राज्यातील 0 ते 20 पटाच्या संख्येच्या आतील शाळा जवळपास 15,000 आहेत या शाळेमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या जवळपास 1,50,000 आहे या शाळा राज्यातील आदिवासी दुर्गम वाडी ,वस्ती ,तांडा ,व पाड्यावरील आहेत म्हणून वंचित घटकातील मुलांच्या शिक्षणाची गैरसोय होऊ नये म्हणून तसेच मुलींच्या शिक्षणामध्ये खंड पडू नये म्हणून या शाळा बंद करण्यात येऊ नये या ही बाबत ही निवेदन देण्यात आले.

4) निवड श्रेणी सेवा अंतर्गत प्रशिक्षणाचा दुसरा टप्पा त्वरित चालू करण्यात यावा व विषय शिक्षक म्हणून पदोन्नती झालेल्या सर्व शिक्षकांना पदवीधर वेतनश्रेणी तात्काळ लागू करण्यात यावी.

5) राज्यातील मराठवाडा विदर्भ या विभागामध्ये जिल्हा परिषदेमार्फत माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा चालवल्या जातात या विभागात माध्यमिक शिक्षकांच्या अनेक जागा रिक्त आहेत या रिक्त जागा पात्र प्राथमिक शिक्षकांमधून भरण्यात याव्यात अशी मागणी करण्यात आली.

6) राज्यातील बहुतांश तालुख्यात गटशिक्षणाधिकाऱ्यांची पदे रिक्त आहेत त्यामुळे शैक्षणिक गुणवत्तेवर परिणाम होत आहे, पर्यवेक्षीय यंत्रणा उपलब्ध होत नाही, म्हणून राज्यात रिक्त असलेली गटशिक्षणाधिकाऱ्यांची पदे त्वरित भरण्यात यावीत.

 7)तसेच मराठवाडा व विदर्भ विभागातील माध्यमिक शाळा वरील राजपत्रित मुख्याध्यापकांची शेकडो पदे रिक्त आहे ती पदे पात्र माध्यमिक शिक्षकातून पदोन्नतीने तत्काळ भरण्यात यावीत.

8)राज्यातील जिल्हा परिषद प्राथमिक -माध्यमिक शाळांची विद्युत देयके जिल्हा परिषदेच्या शेष फंडातून नियमितपणे भरण्यात यावीत, जेणेकरून डिजिटल, ऑनलाइन शिक्षणाचा विद्यार्थ्यांना फायदा होईल.

9)राज्यातील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांना आश्वासित प्रगती योजना तात्काळ लागू करण्यात यावी.

10) राज्यातील शिक्षकांना मुख्यालयी राहण्याच्या जाचक अटीतून तात्काळ सूट देण्यात यावी तसा शासन निर्णय तात्काळ आदेशात करण्यात यावा .

11)सातव्या वेतन आयोगातील प्राथमिक शिक्षक व प्राथमिक पदवीधर व इतर संवर्गातील वेतन त्रुटी तात्काळ दुरुस्त करण्यात याव्यात, बक्षी आयोगाचा खंड दोन तात्काळ प्रकाशित करण्यात यावा.

12) प्रलंबित असलेल्या वैद्यकीय प्रतिपूर्ती देण्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा जिल्हा परिषदेमध्ये कार्यरत असलेल्या शिक्षकांना वैद्यकीय प्रतिकृती देण्यासाठी कॅशलेस विमा योजना लागू करण्यात यावी.

13) 100 पटसंख्या असलेल्या शाळांना पदोन्नती मुख्याध्यापक पद मंजूर करण्यात यावे.

14) जिल्हा परिषदेमध्ये शालेय पोषण आहार शिजवून देणाऱ्या मदतनिस चे मानधन रुपये 5000 करण्यात यावे.

15) राज्यातील जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हा अंतर्गत बदल्या करीत असताना संवर्ग 1 साठी अर्ज भरण्यापूर्वी सर्व रिक्त जागा दाखवण्यात याव्यात.

     

उपरोक्त प्रलंबित असलेल्या प्रश्नाच्या संदर्भात संघटनेच्या वतीने निवेदन दिले असून यावर लवकरच सकारात्मक निर्णय घेऊन कार्यवाही केली जाईल असे आश्वासन यावेळेस नामदार मंत्री महोदयांनी शिष्टमंडळात दिले यावेळी शिष्टमंडळात राज्याचे कार्यवाह श्री मधुकर उन्हाळे  यांच्या नेतृत्वात शिक्षक नेते माणिकराव भोसले,राज्य संघटन मंत्री श्री सुरेश दंडवते,मराठवाडा विभागीय अध्यक्ष श्री संजय कोठाळे,नांदेड जिल्हा अध्यक्ष श्री डी एम पंडागळे, नांदेड जिल्हा कार्यवाह श्री दिगंबर पाटील कुरे ,मराठवाडा उपाध्यक्ष श्री अजित केंद्रे, श्री व्यंकट गंधपवाड जिल्हा संपर्कप्रमुख ,राजेंद्र पाटील जिल्हा प्रवक्ता,विठ्ठल मुखेडकर आदी पदाधिकारी उपस्थित होते असे राज्यप्रसिद्धी प्रमुख श्री रविकिरण पालवे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रानुसार सांगितले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)