महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून 2023 मधील परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक जाहीर

शालेयवृत्त सेवा
0

 



पुणे (शालेय वृत्तसेवा) : 

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून 2023 मधील नियोजित विविध स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे, असे अयोगाचे सहसचिव सुनिल अवताडे यांनी एका प्रसिद्धीपत्रकान्वये कळविले आहे.  


महाराष्ट्र शासनातील दिवाणी न्यायाधिश कनिष्ठ स्तर व न्याय दंडाधिकारी प्रथम वर्ग परीक्षा-2023, महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब व गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-2023, महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा मुख्य परीक्षा-2023, सहायक मोटार वाहने निरीक्षक मुख्य परीक्षा-2023,महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित परीक्षा-2023, राज्य सेवा मुख्य परीक्षा-2023, महाराष्ट्र यांत्रिकी अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा-2023, महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा-2023, महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा -2023, महाराष्ट्र कृषि सेवा मुख्य परीक्षा-2023, सहायक नियंत्रक वैधमापन शास्त्र मुख्य परीक्षा-2023, अन्न व औषध प्रशासकीय सेवा मुख्य परीक्षा-2023 


अशा विविध विभागातील रिक्त असलेल्या पदासाठी आयोगामार्फत 2023 मध्ये घेण्यात येणाऱ्या विविध परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक व इतर माहिती https://mpsc.gov.in आणि https://mpsconline.gov.in  या आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.


प्रस्तावित परीक्षेचे वेळापत्रक निश्चित करतांना संघ लोकसेवा आयोग, विविध विद्यापीठे, परीक्षा घेणाऱ्या इतर संस्था इत्यादींकडून आयोजित करण्यात येणाऱ्या परीक्षा एकाच दिवशी येणार नाहीत व उमेदवारांचे नुकसान होणार नाही यादृष्टीने आयोगाच्या परीक्षांचे वेळापत्रक निश्चित करण्यात येते. तरी संबंधित संस्थानी परीक्षा एकाच दिवशी येणार नाहीत याची दक्षता घेण्याचे आवाहनही आयोगाने केले आहे. 


टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)