कमला नेहरू कन्या विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयचे स्नेह संमेलन उत्साहात संपन्न

शालेयवृत्त सेवा
0

 



    

नंदुरबार ( गोपाल गावित ) :

वे. खा. भगिनी सेवा मंडळ धुळे  संचलित कमला नेहरू कन्या विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, नंदुरबार येथे शालेय प्रांगणात स्नेह संमेलन कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचा अध्यक्षा मा.श्रीमती स्मिताजी अजमेरा तसेच या कार्यक्रमाचे उद्घाटन सौ.मायाताई कृष्णा वळवी (सभापती पंचायत समिती, नंदुरबार) व डॉ. मच्छिंद्र कदम साहेब (माध्यमिक शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद,नंदुरबार) यांच्या हस्ते करण्यात आले. 


या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी कु. अमृताताई अजमेरा (सचिव- वे.खा.भगिनी सेवा मंडळ धुळे), सौ.अनिता पाटील (सदस्य वे.खा.भगिनी सेवा मंडळ,धुळे), श्री. निलेश पाटील (गटशिक्षण अधिकारी पंचायत समिती, नंदुरबार), श्री.भावेश सोनवणे (प्रशासन अधिकारी नगरपरिषद, नंदुरबार), सौ. ललीताताई दामू वळवी ( स्कूल कमिटी सदस्य), सौ. सुनिता अशोक चौधरी (स्कूल कमिटी सदस्य), श्री.अशोक गोपाळ चौधरी (प्रशासन अधिकारी क.ने.क. विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, नंदुरबार), सौ वंदना भगवान पवार (अध्यक्षा शालेय व्यवस्थापन समिती,नंदुरबार),श्री. वामन रामचंद्र माळी (अध्यक्ष-शिक्षक पालक संघ), सौ.वर्षा विवेक पालेकर (उपाध्यक्ष-शिक्षक पालक संघ), श्री. गोपाल गावित (जिल्हाध्यक्ष प्रहार शिक्षक संघटना), सौ. मंजुबेन जैन (सदस्य शालेय समिती प्राथमिक विभाग) तसेच  प्राचार्या श्रीमती वंदना एन.पाटील, तसेच उपप्राचार्य श्री भगवान सी.पवार, उपमुख्याध्यापक श्री.सुनिल एम.पाटील, पर्यवेक्षक श्री.देवेंद्र पी. राजपुत व श्री.संजय एन.चौधरी उपस्थित होते. 


विद्यार्थ्यांच्या कलागुणांच्या अविष्कारासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी विद्यार्थिनींनी देश भक्तीपर गीत, नृत्य, नाटिका, लोकनृत्य, फॅन्सी ड्रेस, गरबा, रोपस्किपिंग, योगासन प्रात्यक्षिक इ. विविध कार्यक्रम सादर केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सांस्कृतिक प्रमुख श्री.जगदिश ए.निकम, श्रीमती वैशाली एस.शिंदे व श्रीमती सोनाली ए. सुशिर यांनी केले. या कार्यक्रमास पालक बंधू-भगिनी, विद्यार्थिनी व विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी बंधू भगिनी उपस्थित होते व कार्यक्रमाचे आभार सौ.राजश्री एम. अहिरराव यांनी मानले.



टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)