'माझा वाढदिवस माझा सन्मान' या उपक्रमास चिमुकल्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

शालेयवृत्त सेवा
0




नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :

शालेय जीवनात विद्यार्थ्यांसाठी अध्ययन अध्यापन प्रक्रिया सुलभ व्हावी आणि भरीव स्वरुपाची आंतरक्रिया घडून यावी यासाठी शिक्षकांकडून अनेक उपक्रम राबविले जातात. शिक्षक विद्यार्थी आणि विद्यार्थी विद्यार्थी यांच्यात प्रेम, जिव्हाळा, आपुलकी निर्माण व्हावी, शालेय जीवनापासूनच सौहार्दाचे वातावरण निर्माण व्हावे यासाठी जवळा येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत 'माझा वाढदिवस माझा सन्मान' या उपक्रमास प्रारंभ करण्यात आला. 


या उपक्रमास चिमुकल्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी मुख्याध्यापक ढवळे जी. एस., सहशिक्षक संतोष घटकार, सरपंच प्रतिनिधी साहेब शिखरे, माजी सरपंच कैलास गोडबोले, शालेय व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष चांदू झिंझाडे,  संभाजी गवारे, आनंद गोडबोले, मारोती चक्रधर आदींची उपस्थिती होती. 


          महात्मा फुले यांच्या स्मृतीदिनानिमित्त त्यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर आकाशवाणीचे प्रासंगिक निवेदक आनंद गोडबोले यांच्या मुलीचा वाढदिवस साजरा करण्यात आला यानिमित्ताने शाळेतील सर्व मुला मुलींना 'एक वही एक पेन' वाटप करण्यात आली. 


यावेळी हस्ताक्षर स्पर्धेतील प्रथम क्रमांक रितेश अनिल गवारे, द्वितीय शाहेद बाबुमियाँ शेख तृतीय रितेश किशन शिखरे यांना प्रमाणपत्र व पुष्पहार देऊन गौरविण्यात आले. माझा वाढदिवस माझा सन्मान' या उपक्रमांतर्गत शाळेतील सर्व विद्यार्थ्यांचा वाढदिवस साजरा करण्यात येणार असल्याचे मुख्याध्यापक ढवळे यांनी  यावेळी सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)