हॅप्पी टू हेल्प फाउंडेशन तर्फे भव्य बक्षीस वितरण सोहळा आणि आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळा 03 डिसेंबरला...

शालेयवृत्त सेवा
0

 



औरंगाबाद- ईद ए मिलादच्या प्रेषितांचे कार्य जगासमोर आणण्यासाठी आणि शिक्षकांच्या लेखनकौशल्याला वाव देण्यासाठी  शिक्षकांसाठी निबंध स्पर्धा हॅप्पी टू हेल्प फॉउंडेशन तर्फे घेण्यात आली होती.सोबतच आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी  प्रस्तावही मागविण्यात आले होते. ते या कार्यक्रमात मान्यवरांच्या शुभहस्ते एकूण 14 शिक्षकांना राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार म्हणून सन्मानित करण्यात येणार आहे. तसेच राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे  7 विजेत्यांना ही रोख बक्षीस आणि ट्रॉफी प्रदान करण्यात येणार आहे.


सर्व विजेत्यांना एक शानदार ट्राॕफी , रोख पुरस्कार  आणि प्रमाणपत्र आणि वाचनसंस्कृती वाढवण्यासाठी एक पुस्तक भेट म्हणून देण्यात येईल. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृषीमंत्री मा. ना.अब्दुलजी सत्तार साहेब,प्रमुख पाहुणे म्हणून औरंगाबाद चे खासदार इम्तियाज जलील,औरंगाबाद विभागाचे शिक्षक आमदार मा. श्री विक्रमजी काळेसाहेब , आमदार श्री. संजयजी शिरसाठ साहेब,  प्राचार्य मा. डॉ, मखदुम फारुकी साहेब, उपजिल्हाधिकारी श्रीम.अंजली धानोरकर मॅम, उप आयुक्त  श्रीम.नंदा गायकवाड मॅम, शिक्षणाधिकारी श्रीम.जयश्री चव्हाण मॅडम, उपशिक्षणाधिकारी श्री.सुफी लाईक अहेमद सर, उपशिक्षणाधिकारी श्रीम.दिपाली थावरे मॅम, प्राचार्य युनूस पटेल, प्राचार्य डॉ. सय्यद नईम  आदींच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडणार आहे. 


भव्य दिव्य सोहळा 03 डिसेंबर 2022 शनिवारी रोजी औरंगाबाद शहरातील प्रसिद्ध भारतरत्न मौलाना आजाद रिसर्च सेंटर, मजनू हिल , टिव्ही सेंटर औरंगाबाद दुपारी 2 :00  वाजता संपन्न् होणार आहे.कोरोनाच्या नंतर हा प्रथमच मोठ्या उत्साहाने सोहळा संपन्न होणार आहे तरी आपण सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन हॅप्पी टू हेल्प फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष शेख अब्दुल रहीम, शेख शब्बीर, शफीक पठाण, सय्यद अब्दुल रहीम, ऍड.इरफान खान, सय्यद ताजीम व हॅप्पी टू हेल्प फाऊंडेशन परिवार तर्फे करण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)