गणेशपुर जूने शाळेत संविधान दिन उत्साहात साजरा

शालेयवृत्त सेवा
0


 

नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :

संविधान दिनाच्या औचित्याने किनवट तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गणेशपूर जूने येथे विद्यार्थी शिक्षक व गावकरी यांनी संविधान दिन उत्साहात साजरा केला.


प्रथम विद्यार्थ्यांनी गावातुन संविधान जनजागृती रॅली काढली.गावातील मुख्य ठिकाणी येऊन सर्व गावकऱ्यांच्या उपस्थितीत संविधान प्रास्ताविक सामुहिक वाचन घेतले.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व प्रास्ताविक प्रविण पिल्लेवार यांनी केले.नंतर डॉ.बाबासाहेब आंबेडकर व भारतीय संविधान पुस्तिकेला पुष्पहार अर्पण करुन संविधानातील पहिल्या भागाची माहिती दिली.आजपासुन दररोज परिपाठात कलमांचे वाचन करुन घेण्यात येणार आहे.


यावेळी गावातील प्रतिष्ठित नागरिक तुकाजी आत्राम,शा.व्य.स.अध्यक्ष विजय मेश्राम,पुंजाबाई नांदे ,दिपक आडे ,वनदेव,मलकु ,जुगनाके, मडावी, कुमरे इ नागरिक उपस्थित होते.तसेच यावेळी अंगणवाडी सेविका कल्पना बावणे,स्वयंपाकी पारुबाई आत्राम, प्रकाश यांनी मदत केली शेवटी सहशिक्षिका उर्मिला परभणकर यांनी आभार मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)