शासकीय अधिकारी/कर्मचारी यांच्या कार्याचे मूल्यमापन होणार.. | Evaluation of employee performance

शालेयवृत्त सेवा
0



शासकीय अधिकारी/कर्मचारी यांचे कार्य मूल्यमापन अहवाल तयार करण्यात येणार..


शासन परिपत्रक-

राज्य शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांचा कार्यमूल्यमापन अहवाल हा महत्वाचा दस्ताऐवज असून त्याआधारे अधिकारी/कर्मचारी यांच्या पुढील विकासासाठी मुलभूत आणि महत्त्वपूर्ण माहिती उपलब्ध होते. कार्यमुल्यमापन अहवाल लिहिणे ही केवळ मुल्यमापन प्रक्रीया नसून अधिका-यांच्या क्षमता व प्रशिक्षण यांचे नियोजन करण्यासाठी उपयुक्त साधन म्हणून याचा वापर होतो.


सर्व शासकीय अधिकारी/कर्मचारी यांचे कार्यमूल्यमापन अहवाल लिहिण्याबाबतच्या मार्गदर्शक सूचना संदर्भाधीन शासन निर्णयान्वये निर्गमित करण्यात आल्या आहेत. तसेच, कार्यमूल्यमापन अहवाल लिहिण्याबाबतचे वेळापत्रक निश्चित केलेले आहे. तथापि त्यानुसार कार्यमुल्यमापन अहवाल वेळेत लिहिले जात नाहीत असे शासनाच्या निदर्शनास आले आहे. यामुळे परिविक्षा कालावधी पूर्ण करणे, स्थायित्व प्रमाणपत्र, पदोन्नती, आश्वासित प्रगती योजना, ५०/५५ व्या वर्षी करावयाचे पुनर्विलोकन इ. बाबी वेळेवर करणे प्रशासनास शक्य होत नाही. परिणामी पदे रिक्त राहिल्याने प्रशासकीय कामकाजावर त्याचा विपरीत परिणाम होतो.


कार्यमूल्यमापनाचा कालावधी संपूर्ण प्रतिवेदन वर्ष म्हणजेच १ एप्रिल ते ३१ मार्च असा आहे. त्या अनुंषगाने, सर्व शासकीय अधिकारी/कर्मचारी यांचे कार्यमूल्यमापन अहवाल लिहिण्याबाबतची कार्यवाही प्रतिवेदन वर्षाच्या पुढील येणाऱ्या ३१ डिसेंबर रोजी पूर्ण होणे आवश्यक आहे. स्वयंमूल्य निर्धारण, प्रतिवेदन, पुनर्विलोकन आणि संस्करण ही प्रत्येक अधिकारी/कर्मचारी यांची वैयक्तिक तसेच सामुहिक जबाबदारी असून ती अत्यंत कर्तव्यदक्षपणे पार पाडणे गरजेचे आहे.


याअनुषंगाने कार्यमूल्यमापन अहवाल लिहिण्याची कार्यवाही विहित वेळेत पूर्ण करण्याबाबत सर्व आस्थापना अधिकारी/संस्करण अधिकारी यांना पुन:श्च खालीलप्रमाणे सूचना देण्यात येत आहेत-

सन २०२१-२२ या वर्षाचे कार्यमूल्यमापन अहवाल लिहिण्याबाबतची संपूर्ण कार्यवाही दिनांक ३१.१२.२०२२ पर्यंत पूर्ण करण्यात यावी.

महापारमध्ये समाविष्ट असलेल्या अधिकाऱ्यांच्या बाबतीत २०२१-२२ या वर्षाचे गोपनीय अहवाल दिनांक ३१ डिसेंबर,२०२२ रोजी महापार प्रणालीत बंद करण्यात येतील. शासन परिपत्रक क्रमांक: सीएफआर १२२०/प्र.क्र. ११९/का.१३


महापारमध्ये समाविष्ट नसलेल्या अधिकारी/कर्मचारी यांच्या बाबतीत सन २०२१-२२ या वर्षाचे कार्यमूल्यमापन अहवाल दिनांक ३१ डिसेंबर, २०२२ पर्यंत अंतिम करण्यात यावेत.


महापार मध्ये समाविष्ट नसलेले कार्यमूल्यमापन अहवाल ज्या स्तरावर आहेत त्या स्तरावर अंतिम करण्याची कार्यवाही संबंधित आस्थापना अधिकारी/संस्करण अधिकारी यांनी करावी. याकरिता त्यांनी संबंधित अधिकारी/कर्मचारी यांचा कार्यमूल्यमापन अहवाल ज्या स्तरावर प्रलंबित आहे, त्या स्तरावरुन प्राप्त करून घेऊन अंतिम करत असल्याचे प्रमाणपत्र जोडून गोपनीय अहवाल नस्तीत लावावा.


दरवर्षी कार्यमूल्यमापन अहवाल लिहिण्याबाबतची संपूर्ण कार्यवाही प्रतिवेदन वर्षाच्या पुढीयेणाऱ्या दिनांक ३१ डिसेंबर पर्यंत पूर्ण करण्यात यावी.

अधिकारी / कर्मचारी यांनी प्रतिवेदन वर्षाचे स्वत:चे स्वयंमूल्यनिर्धारण अहवाल विहित मुदतीत भरून दिले नसल्यास, त्यांच्या स्वयंमूल्यनिर्धारणाशिवाय त्यांचे कार्यमूल्यमापन अहवाल प्रतिवेदन व पुनर्विलोकन अधिकाऱ्याकडून भरुन घेणे आवश्यक राहील. तसेच, जर प्रतिवेदन अधिकारी कार्यमूल्यमापन अहवाल पुनर्विलोकन अधिकाऱ्यास विहीत मुदतीत सादर करु शकले नाहीत, तर संस्करण अधिकाऱ्याने स्वयमूल्यनिर्धारण अहवालाची प्रत थेट पुनर्विलोकन अधिकाऱ्याकडे पाठवावी. (महापारमध्ये समाविष्ट असलेल्या अधिकाऱ्यांच्या बाबतीत Force Forward करण्यात यावेत )


स्वयंमूल्यनिर्धारण अहवाल विहित वेळेत भरून दिलेल्या तथापि प्रतिवेदन व पुनर्विलोकन न होता अंतिम करण्यात आलेल्या कार्यमूल्यमापन अहवालाच्या बाबतीत संबंधित अधिकारी/कर्मचारी यांचे कार्यमूल्यमापन अहवाल पुढील पदोन्नतीच्या पात्रतेच्या किमान निकषाचे असल्याचे गृहित धरण्यात येईल.


कार्यमूल्यमापन अहवाल लिहिण्याबाबतची संपूर्ण कार्यवाही विहित कालावधीत पूर्ण करण्याकरिता वरील संदर्भ क्र.२ येथील दिनांक १७.१२.२०११ च्या शासन निर्णयानुसार कॅम्प चे आयोजन करण्यात यावे. तसेच जे अधिकारी प्रतिवेदन व पुनर्विलोकनाचे काम पूर्ण नाहीत त्यांच्या वेतनवाढी रोखण्याबाबतच्या शासन निर्णयातील तरतुदींची प्रभावी अंमलबजावणी करण्यात यावी.


वरील सर्व कार्यवाही वेळेत केली जाईल याची जबाबदारी संबंधित आस्थापना अधिकारी/ संस्करण अधिकारी यांची राहील.

सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संगणक संकेताक २०२२१११७१७०४५४८१०७ असा आहे. हे परिपत्रक डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.


शासकीय अधिकारी/कर्मचारी यांचे कार्य मूल्यमापन अहवाल तयार करण्याबाबतचा GR दिनांक १७/११/२०२२ वाचा सविस्तर -

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)