अर्धापूर येथील एकता रॅलीत विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

शालेयवृत्त सेवा
0

 


गटशिक्षणाधिकारी व्यंकटेश चौधरी यांनी केले मार्गदर्शन

 

नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :

लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती राष्ट्रीय एकता दिवस निमित्ताने एकता रॅलीचे अर्धापूर शहरात आयोजन करण्यात आले होते. यावेळी विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग होता.


डॉ. इकबाल उर्दु हायस्कुल शारदाभुवन हायस्कुल, संघर्ष कोचिंग क्लासेसचे विद्यार्थी यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. श्री व्यंकटेश चौधरी गटशिक्षणाधिकारी ता. अर्धापूर यांच्या मार्गदर्शनाखाली व श्री रज्जाक शेख सर यांच्या नियोजनातुन कार्यक्रम यशस्वी झाला. संतोष ढोबे, सुनील ढोबे, बखाल सर, पांचाळ सर, केशव वापटकर, आवेज सर , होळे सर, संजय रोडा, संतोष राऊत, पत्रकार सखाराम क्षीरसागर यांची उपस्थिती होती. पोलिस निरीक्षक श्री अशोक जाधव व त्यांच्या स्टाफचे मोलाचे सहकार्य लाभले. 


दौड रॅलीनंतर विद्यार्थी व उपस्थितांना पोलीस स्टेशनतर्फे केळी वाटप करण्यात आली. डॉ. इकबाल हायस्कुलच्या विद्यार्थ्यांच्या विनंतीचा स्वीकार करून श्री जाधव साहेबांनी पोलीस स्टेशन, तेथील विविध बॅनर्स,  त्याठिकाणी होणारी कार्यवाही, विविध गुन्हे व त्याचे वर्गीकरण, सर्व खोल्या व तेथील कामकाज, बिनतारी संदेश यंत्रणा, तक्रारीच्या ऑनलाईन नोंदी याबद्दल खूप सविस्तर मार्गदर्शन केले.

 


टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)