मुलांच्या विकासासाठी ज्ञान आवश्यक -शिक्षणाधिकारी डॉ. सविता बिरगे

शालेयवृत्त सेवा
0

 



मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सवानिमित्त इस्लापूरला तालुकास्तरीय भाषण स्पर्धा संपन्न


नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :

प्रत्येक मूल वेगळे आहे मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी जागतिक पातळीवरील घटना घडामोडी व सर्वकांचे ज्ञान मिळणे आवश्यक आहे. स्पर्धेत टिकून राहण्याची क्षमता निर्माण करण्यासाठी विद्यार्थ्यांना वक्तृत्व आणि अभ्यासात असलेल्या विषयाचे योग्य आकलन होईल यादृष्टीने शिक्षकांचे प्रयत्न आवश्यक असल्याचे मत जिल्हा परिषदेच्या प्राथमिकच्या शिक्षणाधिकारी डॉ. सविता बिरगे यांनी व्यक्त केले. 


मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सवानिमित्त वर्षभर विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे त्या निमित्ताने हुतात्मा स्मारकांना अभिवादन आणि विद्यार्थ्यांच्या तालुकास्तरीय भाषण स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. इस्लापूर येथील हुतात्मा स्मारक परिसरात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. किनवटचे गटविकास अधिकारी सुभाष धनवे , कंधारचे गटशिक्षण अधिकारी बी.जी. शिंदे समग्र शिक्षा चे सहाय्यक कार्यक्रम अधिकारी डॉ. विलास ढवळे, किनवटचे गटशिक्षणाधिकारी अनिल महामुने, सरपंच शारदा शिंगारे , शिक्षण विस्तार अधिकारी मनीषा बडगिरे आदी उपस्थित होते. 


जिल्हा परिषद हायस्कूल इस्लापूर, जिल्हा परिषद हायस्कूल कोसमेट आणि स्थानिक शाळा मधील विद्यार्थ्यांची रॅली जिल्हा परिषद हायस्कूलच्या प्रांगणातून काढण्यात आले मुलींच्या लेझीम पथकांच्या संचलनाने रंगत आणली. मुख्य रस्त्यावरून ही रॅली हुतात्मा स्मारक इस्लापूर येथे पोहोचले हुतात्मा स्मारकात हुतात्मा जयवंतराव पाटील, हुतात्मा लाखा सिंग मेघासिंग लमानी हुतात्मा जानकीलाल मोहनलाल राठी, हुतात्मा तुकाराम किसनराव कवटवार, हुतात्मा गंगाधरराव गव्हाणकर यांच्या स्मृतीस शिक्षणाधिकारी डॉक्टर सविता बिरगे आणि उपस्थित अधिकाऱ्याने अभिवादन केले.


त्यानंतर विद्यार्थ्यांच्या भाषण स्पर्धा झाल्या प्राथमिक गट आणि उच्च प्राथमिक गट अशा दोन गटात या स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. विजेत्या स्पर्धकांना शिक्षणाधिकाऱ्यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले सूत्रसंचालन उत्तम कानिंदे यांनी केले .

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)