राज्यातील विद्यार्थ्यांना मिळणार आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण | Disaster Management Training

शालेयवृत्त सेवा
0

 



            

मुंबई  ( विशेष प्रतिनिधी उदय नरे) : 

महाराष्ट्र राज्य स्कुल सेफ्टी कार्यक्रमांतर्गत राज्यातील 34 जिल्ह्यांतील 34 शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना नागरी संरक्षण दल व होमगार्ड यांच्यामार्फत आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.


राज्याच्या शिक्षण विभाग, युएनडीपी व महाराष्ट्र राज्य आपत्ती व्यवस्थापन विभाग यांच्या पुढाकाराने आणि ‘रिका इंडिया’ या संस्थेच्या सहकार्याने 14 डिसेंबरपर्यंत आपत्ती व्यवस्थापन मॉकड्रिलचे आयोजन करण्यात आले आहे.


नागरी संरक्षण दल व होमगार्ड विभागातील अधिकारी संबंधित शाळा अथवा महाविद्यालयातील शिक्षकांशी समन्वय साधून आपत्ती व्यवस्थापन मॉकड्रिल आयोजित करणार आहेत. यामध्ये विद्यार्थ्यांना आपत्ती अथवा धोक्याची सूचना, आग विमोचन, स्थलांतर, याची प्रात्यक्षिक दाखवण्यात येणार आहेत. विद्यार्थ्यांना नैसर्गिक आपत्ती व मानव निर्मित आपत्तीमध्ये धैर्याने संकटावर मात कशी करावी तसेच आपत्ती व्यवस्थापनाचे बहुमोल व उपयोगी प्राथमिक प्रशिक्षण या मॉकड्रिलच्या माध्यमातून देण्यात येणार आहे.आपत्ती व्यवस्थापनाच्या प्रशिक्षणाने व्यावहारिक जीवनात विद्यार्थ्यांना भविष्यात नक्कीच फायदा होईल असे मत स्काऊटस् सहआयुक्त जितेंद्र महाजन यांनी व्यक्त केले. नैसर्गिक आपत्ती तसेच दुर्घटना घडल्यास विद्यार्थ्यांचे मानवी बळ भविष्यात आपत्ती व्यवस्थापनाला प्राप्त होईल अशी माहिती वरीष्ठ क्रीडा प्रशिक्षक विजय अवसरमोल सरांनी दिली.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)