जागतिक वारसा सप्ताहानिमित्त आंतरराष्ट्रीय चित्रकार तथा उपक्रमशील शिक्षक रणजीत वर्मा यांचे होणार चित्र प्रदर्शन !

शालेयवृत्त सेवा
0

 



समस्त माहूरवासी कलाप्रेमींना सुवर्ण संधी... 

कु.गुंजन रणजीत वर्मा हिच्या चीत्राचे असणार आकर्षण !


नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :               

माहूर येथील प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय दर्जाचे बहुआयामी चित्रकार तथा अध्यापक,माहूर चे नाव ज्यांनी सर्वदूर पसरवत आपल्या कलेने एक वेगळी ओळख निर्माण केली असे श्री.रणजित दत्त वर्मा यांच्या एकल चित्रप्रदर्शनाचे आयोजन शासकीय वस्तूसंग्रहालय माहूर येथे दि.19/11/2022 ते दि.25/11/2022 या कालावधीत करण्यात येणार आहे. ते अनुभवने ही कलाप्रेमींसाठी सुवर्णसंधी आहे.

               

तेव्हा या चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन माहूर नगरीचे सन्माननीय नगराध्यक्ष मा.फिरोज भाई दोसानी यांच्या हस्ते दि.19/11/2022 रोजी सकाळी ठिक 11:00 वा.शासकीय वस्तूसंग्रहालय येथे होणार असून या उद्घाटन कार्यक्रमात आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहून या प्रदर्शनाचा आनंद घ्यावा. 

                  

सदर कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे चित्रकार रणजित वर्मा यांची कन्या कु.गुंजन रणजित वर्मा हिच्या कलाकृतींचा सुद्धा आनंद आपण घेणार आहोत हे विशेष.तसेच सदर प्रदर्शन विनामूल्य असून त्यासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क नाही असे शासकीय वस्तूसंग्रहालय माहूर चे राखणदार आदरणीय श्री. सय्यद आजम यांनी कळविले असून याची नोंद घेऊन आपण मोठ्या संख्येने या कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन श्री.संतोष शेटकार (मा.गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती माहूर.)  श्री.एस.एस.पाटील.(म.रा.शिक्षक परिषद तालुकाध्यक्ष माहूर)  श्री.रणजित दत्त वर्मा(अध्यापक तथा चित्रकार)  श्री.सय्यद आजम(राखणदार-शासकीय वस्तूसंग्रहालय माहूर.  श्री.कंधारे मिलिंद  (हृदयाक्षर) (अध्यापक तथा कवी,लेखक) आदिनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)