राज्यभरातील जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षकांची एक वेतनवाढ पूर्ववत चालू करा - बाबु शेख

शालेयवृत्त सेवा
0

 



वर्धा येथे राज्यातील जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षकांची समन्वय सभा संपन्न !


चंद्रपूर ( शालेय वृत्तसेवा ) :

गांधीजींच्या पावन कर्मभूमी वर्धा येथे राज्यातील जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षकांची समन्वय सभा संपन्न झाली या सभेत अगोदर पासून शैक्षणिक, सामाजिक व राष्ट्रीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षकांच्या कार्याचे वस्तुनिष्ठ मूल्यांकन करून वरियेतेनुसर मूल्यांकन समितीद्वारे निवड करून जिल्हा आदर्श पुरस्कार दिल्या जाते.तसेच या क्षेत्रात दर्जेदार कार्य सदोदित होऊन प्रगतिशील राज्य घडविण्यासाठी अशा काम करणाऱ्यांची एक फळी निर्माण व्हावी म्हणून अशा आदर्श शिक्षकांना एक वेतन वाढ देऊन प्रोत्साहन देण्याची व गुणी जणांचे गुणगौरव करण्याची एक स्वस्थ परंपरा राहिली आहे.


परंतु 2018 च्या शिक्षक दिनाच्या एक दिवस अगोदर म्हणजे 4 सप्टेंबर 2018 ला वेतन वाढ बंद करण्याचा निर्णय अतिशय भेदभाव पूर्ण आणि आपल्या प्रगतिशील राज्याला  शोभणारा नसल्याचे विषद करून शिक्षण क्षेत्रात नवनिर्मिती व सृजनशीलतेला चालना देण्यासाठी एक प्रोत्साहन म्हणून जिल्हा आदर्श शिक्षकांना 4/9/2018 पासून बंद केलेली वेतन वाढ पूर्ववत चालू करण्याची आग्रही मागणी करण्यात आलेली आहे.


या राज्यस्तरीय जिल्हा आदर्श शिक्षक समन्वय सभेसाठी राज्यभरातून चांद्या पासून बांध्या पर्यंतचे, कोकण, खानदेश,मराठवाडा,विदर्भ च्या वेगवेगळ्या जिल्ह्यातून जिल्हा आदर्श शिक्षक बंधू आणि भगिनी मोठ्या संख्येत सहभागी झाले होते. हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी समन्वय सभेने मा.श्री.बाबु शेख,चंद्रपूर यांच्या अध्यक्षतेखाली  राज्यस्तरीय जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार समन्वय समिती ची कार्यकारिणी ची निवड केली असून सदर कार्यकारिणीत राज्यातील समस्त जिल्ह्यातील आदर्श शिक्षकांचा अंतर्भाव केलेला आहे.


गडचिरोलीचे श्री.गौतम लांडगे,सचिव म्हणून तर जळगांवचे श्री.समाधान जाधव कार्याध्यक्ष तर वर्ध्याचे श्री.राजेंद्र भोयर कोषाध्यक्ष तसेच यवतमाळचे श्री हरी जोशी सहसचिव तर चंद्रपूरचे श्री किशोर नीर कार्यालयीन सचिव तसेच महिला प्रतिनिधी म्हणून सौ.सुशीला पोरेडिवार,चंद्रपूर,सौ.ज्योती डाबरे, गोंदिया, सौ.वैद्य,नागपूर. तसेच या समितीचा राज्य समन्वयक म्हणून श्री.नगाजी साळवे,चंद्रपूर यांची निवड करण्यात आली.


श्री.राजेंद्र भोयर आणि वर्धा जिल्ह्यातील जिल्हा आदर्श पुरस्कार प्राप्त शिक्षकांनी या सभेचे सुरेख व उत्तम आयोजन केले. सभेचे सूत्र संचालन श्री.गजानन बर्वे यांनी तर आभार प्रदर्शन श्री.राजेंद्र भोयर यांनी पार पडले.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)