मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे ह्यांनी साहित्य प्रदर्शनाला भेट देऊन विद्यार्थ्यांचे केले कौतूक !

शालेयवृत्त सेवा
0

 



मराठवाडा मुक्तीसंग्राम अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आयोजिलेल्या उपक्रमास प्रतिसाद ।


नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :

जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा निळा येथील... यश माधव हिंगोले,कोमल माधव हिंगोले पुजा भगवान कऱ्हाळे आणि तनुजा मारोती जोगदंड या विध्यार्थ्यासह श्रीमती मोखाडपल्ले मॅडम यांनी परदर्शनात सहभाग नोंदवला. सांदिपानी इंटरनॅशनल स्कूल गाडेगाव कामठा येथे हा कार्यक्रम संपन्न झाला.




नांदेड जिल्ह्याच्या प्रेरणादायी मुख्यकार्यकारी अधिकारी मॅडम श्रीमती वर्षा ठाकूर मॅडम यांनी शाळेतील प्रदर्शनास भेट दिली.आमच्या शाळेतील विध्यार्थ्यांशी साहित्याच्या संदर्भाने चर्चा केली आणि समाधान व्यक्त केले.त्या प्रसंगी माध्यमिक शिक्षणाधिकारी श्री दिग्रसकर साहेब,मा.दिलीप बनसोडे साहेब,पंचायत समिती नांदेड चे गाविकास अधिकारी श्री मुकावर साहेब,डॉ.प्रवीण मुंडे साहेब,मा श्री नागराज बनसोडे साहेब,श्री ढगे सर,राठोड सर, श्रीमती लता कौठेकर मॅडम शिक्षण विस्तार अधिकारी बीट निळा,केंद्रप्रमुख श्री धोपटे व्ही. एस.आणि केंद्रातील इतर सर्व शिक्षकांनी या परदर्शनास भेट देऊन समाधान व्यक्त केले.

   

मुलांना आजच्या प्रसंगी मा.मुख्यकार्यकारी अधिकारी मॅडम यांच्याशी संवाद साधण्याची संधी मिळाली... शाळेच्या वतीने श्रीमती मोखंडपले मॅडम आणि शाळेचे मुख्याध्यापक श्री पोहरे सर व सहभागी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)