भारत स्काउट्स आणि गाईडस् संस्था बुलढाणाच्या वतीने वर्धापन दिन साजरा.

शालेयवृत्त सेवा
0

 



 

बुलढाणा ( शालेय वृत्तसेवा ) :

नोव्हेंबर भारत स्काऊट्स आणि गाईड्स राष्ट्रीय चळवळीच्या स्थापना दिनाचे औचित्य साधून भारत स्काऊट्स आणि गाईड्स संस्था बुलढाणा च्या वतीने वर्धापन दिन दिनांक 7 नोव्हेंबर 2022 सोमवारी साजरा करण्यात आला या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर पी एस वायाळ भारत स्काऊट्स अँड गाईड्स संस्था बुलढाणा चे जिल्हा मुख्यालय आयुक्त होते तर प्रमुख पाहुणे संस्थेचे सचिव श्री रामदासजी शिंगणे सर व जिल्हा प्रशिक्षण आयुक्त श्री पी ओ भोरे सर ढोकणे सर व  पी एस आठवले  जिल्हा स्काऊट संघटक तसेच जिल्हा गाईड संघटक ढोके मॅडम या होत्या.


भारत स्काऊट्स आणि गाईड चळवळीचे जनक लॉर्ड बेडन पावेल यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले तसेच अध्यक्ष व प्रमुख पाहुणे यांचे स्वागत श्री सतीशकुमार पडुळकर ,  निलेश राठोड सर बाबाराव डोईजड, विनोद गणेशकर, दिपक राऊत व‌  मुळे मॅडम यांनी केले.


 वर्धापन दिनाचे औचित्य साधून कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री आदरणीय रामदासजी शिंगणे सर लॉर्ड बेडन पॉवेल यांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकला तसेच पी .ओ .भोरे सरांनी चळवळीचे महत्त्व सांगितले कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर पी.एस.वायाळ यांनी भारत स्काऊट्स आणि गाईडस्  ही चळवळ मुलांना मूल्यावर्धित, नैतिक व संस्कारक्षम असून ती समाजभिमूख  व लोकप्रिय होण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे असे मत आपल्या भाषणातून व्यक्त केले .

 

वर्धापन दिनाचे औचित्य साधून ध्वज स्टीकरचे प्रकाशन मान्यवरांचे हस्ते करण्यात आले.यावेळी ध्वज व  ध्वज  स्टिकर चे महत्त्व जिल्हा स्काउट्स संघटक श्री एस .पी. आठवले सर यांनी आपल्या भाषणातून  सांगितले .या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा गाईड्स संघटक ढोके  मॅडम यांनी केले तसेच या कार्यक्रमासाठी विविध तालुक्यातून  स्काऊटर  व गाईडर उपस्थित होते. त्याच बरोबर स्काऊट आणि गाईड  मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. या कार्यक्रमास सुवर्णा कुलकर्णी, शारदा वानखेडे (झनके) व साधना मुळे मॅडम व श्री.विनोद सावळे सर उपस्थित होते. विविध तालुक्यातून स्काऊटर व गाईडर उपस्थित होते. तसेच संस्थेच्या सर्व कर्मचाऱ्यांचे मोलाचे सहकार्य मिळाले.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)